महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'या' राज्यांमध्ये असणार 'नाईट कर्फ्यू' - न्यू इअर कर्फ्यू

संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्याबाबात केंद्र सरकारने नोटीस जारी केली आहे. यासोबतच हॉटेल, पार्क, कन्वेन्शन सेंटर यासंबधीही नियमावली जारी केली आहे. सर्वात प्रथम महाराष्ट्र सरकारने रात्री ११ ते सकाळी सहावाजेपर्यंत कर्फ्यू जाहीर केला.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र

By

Published : Dec 31, 2020, 6:51 PM IST

हैदराबाद - नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण आतूर झाले आहेत. पार्टी, नाईट आऊटचं अनेकांचे नियोजन सुरू आहे. मात्र, यावर्षी कोरोनामुळे नववर्षाच्या जल्लोषावर बंधनं आली आहेत. अनेक राज्यांनी कोरोनाचा धोका पाहता 'नाईट कर्फ्यू' लागू केला आहे. अनेक राज्यात रात्री १० ते सकाळी ५ या सुमारास कर्फ्यू असणार आहे. संचारबंदीचे पालन करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 'ड्रिंक अ‌ॅन्ड ड्राईव्ह' करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने जारी केली नोटीस-

संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्याबाबात केंद्र सरकारने नियमावली जारी केली आहे. यासोबतच हॉटेल, पार्क, कन्वेन्शन सेंटर यासंबधीही नियमावली जारी केली आहे. सर्वात प्रथम महाराष्ट्र सरकारने रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत कर्फ्यू जाहीर केला. डिसेंबर २२ ते ५ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रतील सर्व महानगरपालिका क्षेत्रात संचारबंदी असणार आहे.

कोणकोणत्या राज्यात कर्फ्यू असणार?

महाराष्ट्र, ओडिशा, दिल्ली, कर्नाटक, गुजरात, केरळ राजस्थान, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, मनिपूर आणि पंजाब सरकारने नाईट कर्फ्यू जारी केला आहे. पर्यटकांचे आकर्षण केंद्र गोवा राज्याने अद्याप संचारबंदी लागू केली नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू लावावा म्हणून गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी सरकारपुढे प्रस्ताव मांडला होता. दिल्ली, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या निर्णयानुसार गोव्यातही कर्फ्यू असावा, असे या प्रस्तावात म्हटले होते. मात्र, सरकारने यावर कोणताही निर्णय घेतला नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाचे स्वागत केले जात आहे. हे नववर्ष सर्वसाधारण नसल्याने कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करत रात्री ११ वाजेपर्यंत पार्टी आटोपून घ्या, असे आवाहन मुंबई महापालिकेने मुंबईकरांना केले आहे. तसेच, आज रात्री ११ नंतर दिड वाजेपर्यंत हॉटेल, रेस्टोरंटना होम डिलिव्हरी आणि पार्सल नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाचे हॉटेल, रेस्टोरंटच्या 'आहार' या संघटनेने स्वागत केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details