महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Cervical Cancer Vaccine गर्भाशयाच्या कर्करोगावर सीरम इन्स्टिट्यूट आज लाँच करणार ' स्वदेशी लस' - कर्करोगावर सीरम इन्स्टिट्यूट आज करणार लाँच लस

गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने Serum Institute Cervical Cancer Vaccine तयार केली आहे. गर्भाशय कर्करोगाच्या रुग्णांसाठी सीरम इन्स्टिट्यूटने 'क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस' ही Serum institute launch vaccine Cervical Cancer Vaccine स्वदेशी लस विकसित केली आहे. आज 1 सप्टेंबर रोजी ही लस लाँच करणार आहेत.

Cervical Cancer Vaccine
Cervical Cancer Vaccine

By

Published : Sep 1, 2022, 12:27 PM IST

भारतात दरवर्षी अनेक महिलांचा गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू होतो. या भयानक आजारावर मात करणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने Serum Institute Cervical Cancer Vaccine तयार केली आहे. गर्भाशय कर्करोगाच्या रुग्णांसाठी सीरम इन्स्टिट्यूटने 'क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस' ही Serum institute launch vaccine Cervical Cancer Vaccine स्वदेशी लस विकसित केली आहे. आज 1 सप्टेंबर रोजी ही लस लाँच करणार आहेत.

सध्या जगभरात गर्भाशयाच्या कर्करोगासाठी दोन लसी उपलब्ध आहेत. पहिली क्वाड्रिव्हॅलेंट लस आणि दुसरी बायव्हॅलेंट लस आहे. जी सीरमने तयार केली आहे. हे हिपॅटायटीस बी लसीप्रमाणेच VLP Virus-like particles वर आधारित आहे. या लसीच्या आगमनामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यास मदत होणार असून या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. भारतात गर्भाशयाचा कर्करोग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा जगभरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग आहे. 15 ते 44 वयोगटातील महिलांमध्ये कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये हे दुसरे सर्वात सामान्य कारण आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर IARC-WHO नुसार, भारतात दरवर्षी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची 1.23 लाख प्रकरणे आढळतात. यामध्ये सुमारे 67,000 महिलांचा मृत्यू होतो. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या बाबतीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details