मुंबई - शेअर बाजारात आज व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 973.1 अंकांच्या म्हणजेच 1.62 टक्क्यांच्या वाढीसह 60,905.34 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 223.30 अंकांच्या किंवा 1.38 टक्क्यांच्या वाढीसह 17,854.05 च्या पातळीवर बंद झाला. सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्समधली आजची ही वाढ गुंतवणूकदारांना दिलासा देणारी होती.
टायटन आणि बजाज फिनसर्व्ह टॉप गेनर्स ठरले :टायटन, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, यूपीएल, इंडसइंड बँक, एचडीएफसी आणि एसबीआय लाईफ या 29 निफ्टी-50 समभागांमध्ये वाढ होत आहे. दुसरीकडे, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, डिव्हिस लॅब, बीपीसीएल, हिंदाल्को, टाटा कंझ्युमर, एचडीएफसी लाईफ आणि हिरो मोटोकॉर्प यांच्यासह 21 निफ्टी समभाग घसरत आहेत.
अदानी एंटरप्रायझेसचे शेअर घसरले :बाजारातील या तेजीमध्ये अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. अदानी एंटरप्रायझेसमध्ये 17% आणि अदानी ट्रान्समिशनमध्ये 10% पेक्षा जास्त घट दिसून येत आहे. याशिवाय अदानी पोर्ट्स, टोटल गॅस, विल्मर आणि पॉवरमध्ये जवळपास 5-5% ची घसरण दिसून येत आहे. दुसरीकडे, अदानी समूहाने अलीकडेच विकत घेतलेल्या कंपन्या, अंबुजा सिमेंट NDTV 5%, अंबुजा सिमेंट 2% आणि ACC 1% पेक्षा जास्त घसरत आहे. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे वरील शेअर्स मध्ये गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार अडचणीत सापडले आहेत.