महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Seema Haider : 'वहिनी एकदम जबरदस्त आहे!', सीमा हैदरचा मेहुण्यासोबत व्हिडिओ व्हायरल - सीमा हैदरचा मेहुण्यासोबत व्हिडिओ

पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदर आणि सचिनच्या प्रेमकथेने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आता त्यांचा एक नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सचिनचा धाकटा भाऊ सीमासोबत दिसतो आहे.

Seema Haider
सीमा हैदर

By

Published : Jul 16, 2023, 5:54 PM IST

लखनऊ : पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर आणि तिचा पती सचिन यांचे रोज नवे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये सीमा हैदरचा मेहुणा तिच्यासोबत विनोद करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

'वहिनीने आत्तापर्यंत जेवण बनवले नाही' : या व्हिडिओमध्ये सचिनचा भाऊ त्याच्या वहिनीसोबत देसी स्टाईलमध्ये थट्टा करताना दिसत आहे. एका वाहिनीच्या रिपोर्टरने सचिनच्या भावाला तू कोण आहे? असे विचारले असता त्याने मी सचिनचा लहान भाऊ आहे, असे सांगितले. जेव्हा त्याला विचारले की, वहिनी आली आहे. ती कशी आहे?, तिने जेवण बनवले की नाही? यावर, वहिनी एकदम जबरदस्त आहे. मात्र तिने आत्तापर्यंत जेवण बनवलेले नाही, असे उत्तर त्याने दिले.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : या व्हिडिओमध्ये सचिनचा भाऊ, वहिणीसोबत गंमत नाही करणार तर कोणासोबत करणार, असे म्हणताना दिसला. त्यांच्या मस्तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. #SeemaHaider हा हॅशटॅग वापरून ट्विटरवर हा व्हिडिओ अनेक वेळा अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंटही करत आहेत. ईटीव्ही भारत या व्हायरल व्हिडिओला कोणताही दुजोरा देत नाही.

काय आहे प्रकरण? : सीमा हैदर आणि सचिनच्या प्रेमकथेचे नवनवीन किस्से रोज सोशल मीडियावर समोर येत आहेत. पबजी गेम खेळताना पाकिस्तानच्या सीमा हैदरचे भारताच्या सचिनवर प्रेम जडले. यानंतर ती आंतरराष्ट्रीय सीमा पार करून चार मुलांसह भारतात आली आणि तिने सचिनशी लग्न केले. सीमा सांगते की तिने हिंदू धर्म स्वीकारला आहे. तसेच तिला पाकिस्तानात पाठवू नका अन्यथा तिला ठार मारले जाईल असेही ती म्हणते. दुसरीकडे, सीमा हैदरला पाकिस्तानी गुप्तहेर ठरवून तिला शिक्षा करण्याची मागणी होत आहे. सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवण्याची चर्चाही सध्या सुरू आहे.

हेही वाचा :

  1. Seema Haider News: सीमाला पाकमध्ये परत पाठवा, अन्यथा पुन्हा मुंबईवर हल्ला...मुंबई पोलिसांना धमकी, नेमके प्रकरण काय?
  2. Seema Haider Interview : तपास पूर्ण होताच नागरिकत्व घेणार आणि थाटामाटात लग्न करणार; सीमा गुलाम हैदरशी खास बातचीत

ABOUT THE AUTHOR

...view details