महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Terrorists killed in Jammu Kashmir: घुसखोरीच्या प्रयत्न सुरक्षा दलाने हाणून पाडला, कारवाईत चार दहशतवादी ठार:

उत्तर काश्मीरमधील कुपवाडामधील माछिल सेक्टरमधील काला जंगलात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चार दहशतवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले आहे.

Terrorists killed in Jammu Kashmir
कारवाईत चार दहशतवादी ठार

By

Published : Jun 23, 2023, 11:11 AM IST

Updated : Jun 23, 2023, 11:36 AM IST

श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर):गेल्या काही महिन्यांपासून जम्मू व काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचे सर्व प्रयत्न वाया जात आहेत. अशीच कारवाई समोर आली आहे. काश्मीर पोलिसांनी अधिकृत ट्विटर हँडलद्वारे दहशतवाद्यांविरोधातील कारवाईची माहिती दिली आहे. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले, की संयुक्त कारवाईत, सैन्यदल आणि पोलिसांनी कुपवाडामधील मछल सेक्टरच्या काला जंगलात चार अतिरेक्यांना ठार केले आहे. हे दहशतवादी सीमारेषेवरून घुसखोरीचा प्रयत्न करत होते.

उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथील सीमावर्ती जिल्ह्यातील माछिल भागात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीच्या प्रयत्नात असलेले चार दहशतावदी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) सैन्यदलासोबत संयुक्त कारवाई केली आहे. आठवडभरापूर्वी सुरक्षा दलाने दोन अज्ञात अतिरेक्यांना ठार केले होते. त्यांनतर ही मोठी कारवाई केली आहे.

यापूर्वीदेखील करण्यात आली कारवाईकुपवाडा जिल्ह्यातील डोबानार मच्छल भागात (एलओसी) सैन्यदल आणि कुपवाडा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांचा नायनाट केल्याचे पोलीस प्रवक्त्याने म्हटले आहे. नुकतेच सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) कुपवाड्यातील हंदवाडा शहरात स्फोटक साहित्य जप्त केले. हे साहित्य हंदवाडा-नाओगाव राज्य महामार्गालगतच्या एका पुलाजवळील भाटपुरा गावात आढळे होते. यापूर्वी, 3 मे रोजी, उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरच्या पिंचड भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत दोन संशयित अतिरेकी ठार झाले होते, असे पोलिसांनी सांगितले. 16 जून रोजी कुपवाडामधील नियंत्रण रेषेजवळील जुमागुंड भागात पाच विदेशी अतिरेकी मारले गेले.

22 जुनला दोन दहशतवाद्यांना अटक:जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलांनी 22 जुनला अनंतनाग येथून दोन दहशतवाद्यांना अटक केली. दोन्ही दहशतवाद्यांना दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहेरा भागातून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि दारूगोळाही जप्त करण्यात आल्याचे सुत्राने सांगितले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने छापा टाकून ही मोठी कारवाई केली आहे.

हेही वाचा-

  1. Mumbai Bomb Blast : 26/11 हल्ल्यातील आरोपी साजिद मीरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव चीनने रोखला
  2. Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडात गोळ्या घालून हत्या
Last Updated : Jun 23, 2023, 11:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details