महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

SCO summit 2023 In Goa: भारत-चीन द्विपक्षीय चर्चा! जयशंकर अन् चिन कांग यांच्यात चर्चा

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे चिनी समकक्ष चिन कांग यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेच्या (सीएफएम) बैठकीच्या बाजूला कोस्टल रिसॉर्टमध्ये जयशंकर यांनी चिन कांग यांच्याशी संवाद साधला.

SCO summit 2023 In Goa
SCO summit 2023 In Goa

By

Published : May 4, 2023, 10:11 PM IST

बेनौलिम (गोवा) : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गुरुवारी त्यांचे चीनी समकक्ष चिन कांग यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली ज्यामध्ये पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेचा (एलएसी) वाद ठळकपणे समोर आल्याचे समजते. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेच्या (CFM) बैठकीच्या बाजूला कोस्टल रिसॉर्टमध्ये ही बैठक झाली. बैठकीपूर्वी माहिती सूत्रांनी सांगितले की, तीन वर्षांपासून सुरू असलेला पूर्व लडाखमधील सीमा विवाद चर्चेच्या केंद्रस्थानी असेल. जयशंकर आणि कंग यांच्यातील गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी भेट आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री मार्च महिन्यात झालेल्या G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आले होते.

दोन्ही देशांमधील संबंधांचा संपूर्ण पाया : या बैठकीत जयशंकर यांनी कांग यांच्याशी चर्चा केली होती, ज्यामध्ये त्यांनी आपल्या चिनी समकक्षांना सांगितले की पूर्व लडाखमधील तणाव लांबणीवर पडल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध 'असामान्य' आहेत. भारताने गेल्या आठवड्यात SCO संरक्षण मंत्री स्तरावरील बैठकीचे आयोजन केले होते. भारत, रशिया, चीन आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या इतर सदस्य देशांनी शुक्रवारी नवी दिल्लीत आयोजित या बैठकीत प्रादेशिक सुरक्षा आव्हाने आणि संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांचे चिनी समकक्ष ली शांगफू यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांना स्पष्ट संदेश दिला की चीनने विद्यमान सीमा करारांचे उल्लंघन केल्याने दोन्ही देशांमधील संबंधांचा संपूर्ण पाया आणि वास्तविक नियंत्रण रेषेचे (एलएसी) नुकसान झाले आहे. सर्व समस्या विद्यमान द्विपक्षीय करारांनुसार सोडवल्या पाहिजेत असही ते म्हणाले आहेत.

कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेच्या 18 फेऱ्या झाल्या : 5 मे 2020 रोजी पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर हा गोंधळ सुरू झाला. यानंतर, दोन्ही देशांमधील लष्करी आणि राजनैतिक स्तरावरील चर्चेच्या अनेक फेऱ्यांच्या परिणामी, दोन्ही बाजूंनी पॅंगॉन्ग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनारी आणि गोगरा परिसरातून आपले सैन्य मागे घेतले. मात्र, काही मुद्दे अजूनही कायम आहेत. पूर्व लडाखमधील उर्वरित विवादित प्रश्न सोडवण्यासाठी भारत आणि चीनमध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेच्या 18 फेऱ्या झाल्या आहेत.

हेही वाचा :Wrestlers Protest: आंदोलक पैलवानांचा छळ सुरूच! लोकांचा पाठिंबा वाढतोय; सरकार मात्र गप्पचं

ABOUT THE AUTHOR

...view details