नवी दिल्ली SC Issues Notice to MH Speaker :अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांना पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरवण्याच्या याचिकांवर जलदगतीने निर्णय घेण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटानं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज नोटीस बजावली. .
दोन्ही प्रकरणांची एकदाच सुनावणी : याचिकाकर्ते जयंत पाटील यांच्या बाजूनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हे प्रकरण मांडलंय. अजित पवार गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यावेळी म्हणाले की, अपात्रतेची याचिका सप्टेंबरमध्येच दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्यानं लवकरच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या दाव्याचं खंडन करताना सिब्बल म्हणाले की, याचिका जुलैमध्ये दाखल करण्यात आल्या होत्या. शिवसेनेच्या प्रकरणासह या प्रकरणाची यादी करण्याची सूचना सरन्यायाधीश यांनी केली. दोन्ही प्रकरणांमध्ये तथ्य वेगळे असल्याचं रोहतगी म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेचं पालन करावं : 18 सप्टेंबर रोजी, सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर शिवसेना आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी जलदगतीनं सुरू केली होती. विधानसभा अध्यक्षांना एका आठवड्याच्या आत या प्रकरणाची यादी देण्यास सांगितलं. अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यासाठी वेळ निश्चित करण्यासही सांगितलंय. तसंच सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय की, विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेचं पालन केलं पाहिजे. मात्र न्यायालयानं एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांचे भवितव्य ठरवण्यास सभापती राहुल नार्वेकर यांना सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला चार महिने उलटूनही विधानसभा अध्यक्षांनी ठोस निर्णय घेतला नसल्यानं ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले आहेत.
हेही वाचा :
- NCP Political Crisis : राष्ट्रवादीचं घड्याळ कुणाचं? काका-पुतण्याचं भवितव्य ठरणाऱ्या आज 'या' दोन आहेत महत्त्वाच्या सुनावणी
- Ajit Pawar Group In SC : शरद पवार गटानंतर अजित पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव; सोमवारी सुनावणी?
- Anna Hazare On Jitendra Awhad : अण्णा हजारे आणि जितेंद्र आव्हाड वाद पेटला; अण्णा हजारे दाखल करणार अब्रू नुकसानीचा खटला