प्रतिक्रिया देतांना नवीन जोडपे शंकर आणि सरस्वती कानपूर :शहरातील चौबेपूर पोलीस ठाण्यात एका तरुण आणि तरुणीच्या लग्नाची बातमी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. झारखंडचा रहिवासी असलेला शंकर आणि बिहारची रहिवासी सरस्वती यांनी शनिवारी कानपूरच्या चौबेपूर पोलीस ठाण्याच्या मंदिरात सात फेरे घेतले. पोलीस ठाण्यात हे लग्न कुणी पाहिलं असेल तर नवलच.
कानपूरच्या ठाण्याच्या मंदिरात पार पडला अनोखा विवाह सोहळा समाधान दिवसाला तरुणीने मांडली व्यथा : शनिवारी पोलीस ठाण्यात आयोजित 'समाधान दिवस' चर्चासत्रात ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या जात असल्याचे स्टेशन प्रभारी चौबेपूर जगदीश पांडे यांनी सांगितले. दरम्यान, बिहारमधील सरस्वती या तरुणीने येऊन सांगितले की, तिला झारखंडमधील शंकर या तरुणाशी लग्न करायचे आहे, परंतु घरातील सदस्य तयार होत नाहीत. अनेक तरुण तिला त्रास देतात, त्यामुळे तिला लवकरात लवकर लग्न करायचे आहे, असेही सरस्वती म्हणाली.
पोलिसांचे आभार मानले : यानंतर लगेचच स्टेशन प्रभारींनी झारखंडचा रहिवासी असलेल्या शंकरला बोलावले. शंकरशी लग्नासाठी बोलने केले. शंकरने लग्नाला संमती दर्शवताच त्यांनी लगेचच पोलीस ठाण्याच्या मंदिरात दोघांचे लग्न लावून दिले. दोघांच्या नातेवाईकांना बोलावून मंदिरात लग्न लावून देण्यात आले. समाधान दिनी तरुण-तरुणीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याचे घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी सांगितले. त्याचवेळी लग्नानंतर शंकर आणि सरस्वती खूप आनंदी दिसत होते. त्याबद्दल दोघांनीही पोलिसांचे आभार मानले.
सध्या सोशल मिडीया आणि आधुनिकतेच्या जगात अनेक तरुण-तरुणी कोर्ट मॅरेज करुन सर्रास मोकळे होतात. मात्र आई वडीलांच्या मतांचा आदर करीत, आपल्या प्रेमाची वाट बघणाऱ्या सरस्वतीला आपली समस्या सांगण्यास पोलिसांची मदत घ्यावी लागली. आणि मुख्य म्हणजे चौबेपूर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी देखील दोन्ही बाजुची परिस्थिती लक्षात घेता, समस्येवर वेळीच तोडगा काढून शंकर आणि सरस्वती चे लग्न लावुन दिले.
हेही वाचा : Pancharatna Yatra: शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करणाऱ्या मुलीला प्रोत्साहनपर 2 लाख रुपये देणार -कुमारस्वामी