तिरुअनंतपुरम: टी-20 विश्वचषकापूर्वी ( T20 World Cup 2022 ) भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यांची टी-20 मालिका जिंकली आहे. आता त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका ( IND vs SA T20 Series ) खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (28 सप्टेंबर) तिरुअनंतपुरममध्ये होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ तिरुअनंतपुरमला पोहोचला, तेव्हा येथे चाहत्यांनी भारतीय यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या नावाने घोषणाबाजी केली.
मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ तिरुअनंतपुरमला पोहोचला आहे. मात्र इथे चाहत्यांमध्ये वेगळेच संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. भारतीय संघातून बाहेर असलेल्या संजू सॅमसनच्या समर्थनार्थ त्याच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली. भारतीय खेळाडूंना पाहताच चाहत्यांनी संजू-संजूच्या घोषणा देण्यास सुरुवात ( Crowd chants Sanju Sanju ) केली.
आफ्रिका मालिका आणि त्यानंतर टी-20 विश्वचषकासाठी संजूची ( Sanju Samson ) संघात निवड झालेली नाही. त्यामुळे चाहतेही नाराज दिसत आहेत. चाहत्यांचा संजू-संजूच्या नारेबाजीचा व्हिडिओही प्रचंड व्हायरल होत आहे.
यादरम्यान एक व्हिडिओ आणखी व्हायरल होत आहे. यामध्ये सूर्यकुमार यादव बसमध्ये बसून संजू सॅमसनचा फोटो बाहेरून घोषणाबाजी करत चाहत्यांना दाखवताना दिसत आहेत. हे दृश्य पाहून चाहतेही थक्क झाले. त्याचे काही व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल होत आहेत.
ऑस्ट्रेलियानंतर आता आफ्रिकेची पाळी -
विश्वचषकापूर्वी भारताच्या पहिल्या कसोटीत संघ यशस्वी ठरला आहे. त्यांनी टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला. आता दक्षिण आफ्रिकेची पाळी आहे. 28 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा सुरू होत आहे, ज्यामध्ये 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका ( India vs South Africa T20 Series ) -
पहिला टी-20 : 28 सप्टेंबर, तिरुवनंतपुरम, संध्याकाळी 7.30 वाजता
दुसरा टी-20 : 2 ऑक्टोबर, गुवाहाटी, संध्याकाळी 7.30 वाजता