महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sakshi's Tweet On Electricity :साक्षी धोनीने झारखंड सरकारला वीज संकटाबाबत विचारणा केली - झारखंड सरकार

झारखंडमध्ये विजेची समस्या (power cut in jharkhand) किती गंभीर आहे, याचा अंदाज गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाला येत आहे. ही अडचण इतकी वाढली आहे की, महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षीने (Sakshi Mahendra Singh Dhoni's wife) झारखंड सरकारला (Government of Jharkhand) या समस्ये बाबत विचारणा केली आहे.

sakshi dhoni
साक्षी धोनी

By

Published : Apr 28, 2022, 8:37 AM IST

रांची: झारखंडमध्ये सुरू असलेल्या लोडशेडिंगमुळे सर्वसामान्यांनाच नाही तर विशेष लोकांनाही याचा सामना करावा लागत आहे. लोक इतके अस्वस्थ झाले आहेत की ते अगदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही आपला राग काढत आहेत. वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येने हैराण झालेल्या माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीने सरकारला ही समस्या इतक्या वर्षांपासून का आहे, असा सवाल केला आहे.

भारताचा माजी कर्णधार आणि रांचीचा राजकुमार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीने झारखंडमधील विजेच्या समस्येवर राग व्यक्त केला. तीने ट्विट करत झारखंडमध्ये इतक्या वर्षांपासून विजेची समस्या का आहे, असा सवाल सरकारला केला. मी झारखंडची करदाता असल्याने मला इथे इतक्या वर्षांपासून विजेची समस्या का आहे हे जाणून घ्यायचे आहे, असा सवाल साक्षीने सरकारला विचारला आहे. ऊर्जेची बचत करून आम्ही आमची जबाबदारी तत्परतेने पार पाडत आहोत. असेही तीने म्हणले आहे.

झारखंडमध्ये वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या सातत्याने पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अखंडित वीज मिळत नाही. राजधानी रांचीबद्दल बोलायचे झाले तर, येथील लोकांना दररोज लोडशेडिंगच्या समस्येचा सामना करावा लागत आहे आणि कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details