हरिद्वार : आज संपूर्ण देश मोठ्या थाटामाटात होळीचा सण साजरा करण्यात मग्न आहे. आज सर्वत्र रंगांचा वर्षाव होत आहे. प्रत्येकजण अबीर गुलालात रंगलेला दिसतो. उत्तराखंडबद्दल बोलायचे झाले तर इथेही अबीर गुलाल उधळला जात आहे. देवभूमीतील होळी मोठ्या उत्साहात साजरी करत आहेत. हरिद्वार या पवित्र शहरातही होळी साजरी केली जाते. हरिद्वारचा संत समाजही मोठ्या थाटामाटात होळी साजरी करत आहे. हरिद्वारच्या निरंजनी आखाड्यात आखाडा परिषदेचे अध्यक्ष व निरंजनी आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी आखाड्याच्या संतांसोबत होळी खेळली.
नवी सुरुवात करण्याचा संदेश : होळीनिमित्त निरंजनी आखाड्यात आखाडा परिषदेच्या अध्यक्षही राधाकृष्णाच्या गाण्याच्या तालावर नाचले. आखाड्याशी संबंधित सर्व संतांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. संतांनीही होळीच्या निमित्ताने तक्रारी दूर करून; नवी सुरुवात करण्याचा संदेश दिला.
पहिल्यांदाच आखाड्यात साजरी झाली संतांची होळी : धर्मनगरी हरिद्वारमध्ये पहिल्यांदाच आखाड्यात संतांनी होळी खेळल्याचे दिसून आले आहे. निरंजनी आखाड्याचे महंत आणि आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी म्हणाले की, 'आम्हाला संपूर्ण देशाला परस्पर बंधुभावाचा संदेश द्यायचा आहे. होळीच्या निमित्ताने मी सर्वांना हे सांगू इच्छितो की, या दिवशी सर्व तक्रारी मिटवून संघटित व्हा आणि राष्ट्र उभारणीला सुरुवात करा. आज भारत कोणत्याही देशापेक्षा कमी नाही. तो दिवस दूर नाही जेव्हा भारत पुन्हा एकदा जागतिक नेता म्हणून उदयास येईल. ज्यासाठी आपल्या सर्वांचे योगदान आवश्यक आहे.
आनंद आणि उत्साहाचा सण : होळी हा सण भारतात सर्वत्र साजरा केल्या जातो. काही राज्यात 7 मार्च रोजी रंगपंचमी साजरी करण्यात आली. तर काही राज्यात 8 मार्चला रंगपंचमी खेळल्या गेली. रंगपंचमी हा सण सर्वच वयोगटातील नागरिक साजरा करित असल्याने, उत्साहाचे वातावरण असते. या दिवशी सगळ्या जाती-धर्माचे लोक भेदभाव विसरुन आनंद साजरा करतात. यंदा धर्मनगरी हरिद्वारमध्ये पहिल्यांदाच आखाड्यात संतांनी होळी खेळली. 'यावेळी सर्व तक्रारी मिटवून संघटित व्हा आणि राष्ट्र उभारणीला सुरुवात करा. आज भारत कोणत्याही देशापेक्षा कमी नाही. तो दिवस दूर नाही जेव्हा भारत पुन्हा एकदा जागतिक नेता म्हणून उदयास येईल. ज्यासाठी आपल्या सर्वांचे योगदान आवश्यक आहे', असे आव्हान देखील निरंजनी आखाड्याचे महंत आणि आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी केले.
हेही वाचा : Baba Ramdev Holi Of Flowers : बाबा रामदेवांनी शिष्यांसह खेळली फुलांची होळी