सागर (मध्यप्रदेश ) :मध्य प्रदेशातील सागरच्या जैन पब्लिक स्कूलमध्ये 30 शाळकरी मुलांनी एकाच सिरिंजने कोरोनाची लस दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेची माहिती पालकांना मिळताच त्यांनी शाळेत पोहोचून एकच गोंधळ घातला. या गोंधळानंतर सीएमएचओ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणी लसीकरण करणारे व लसीकरण अधिकारी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. जिल्हा लसीकरण अधिकाऱ्याला हलगर्जीपणा केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे. त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. लसीकरण करणारे प्रशिक्षणार्थी एएनएम यांच्याविरुद्धही एफआयआर नोंदवण्यात आला आहे. (Negligence in vaccination in Sagar) (Vaccine applied to 30 children with same syringe) (Corona Vaccination Sagar) (Corona vaccine camp for Children in Sagar)
अधिकाऱ्याचे तत्काळ प्रभावाने निलंबन : आयुक्त मुकेश शुक्ला यांनी लसीकरण मोहिमेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.शोभाराम रोशन यांना निलंबित केले. लसीकरणकर्त्याने 40 शाळकरी मुलांना एकाच सिरिंजने लस दिली होती. प्रथमदर्शनी जिल्हा लसीकरण अधिकारी यांनी लसीकरण केंद्रांची वेळोवेळी तपासणी केली नसल्याचे आढळून आले. लसीकरण मोहिमेत हलगर्जीपणा केल्याबद्दल त्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.