कीव: आपले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत रशिया युक्रेनमध्ये लष्करी कारवाया सुरूच ठेवणार असल्याची प्रतिक्रिया रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी दिली आहे. आमची मोहीम योजनेनुसार सुरू आहे. ती मोहीम वेगाने पुढे जात नाही कारण रशियाला नुकसान करायचे नाही. रशियाच्या पूर्वेतील व्होस्टो येथे स्पेस लॉन्च सेंटरला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. दरम्यान, पुतीन म्हणाले, की युक्रेनने इस्तंबुलमध्ये रशियाशी केलेल्या चर्चेदरम्यान जो प्रस्ताव ठेवण्यात आला होता त्यामधून माघर घेतली. त्यामुळे कारवाई करण्यावाचून आमच्याकडे पर्याय नाही राहिला असही ते म्हणाले आहेत.
आम्ही आमच्या भागीदारांसोबत काम करू - पुतिन म्हणाले, की रशिया वेगळा होऊ शकत नाही. तसेच, आमचा असा कोणताही हेतू नसून परकीय शक्तीही त्याला वेगळे करण्यात यशस्वी होणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. आजच्या जगात, विशेषत: रशियासारख्या विशाल देशाला वेगळे करणे नक्कीच अशक्य आहे. आम्ही आमच्या भागीदारांसोबत काम करू. ज्यांना सहकार्य करायचे आहे त्यामध्ये ते सोबत असतील. रशियाने (२४)फेब्रुवारी रोजी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर पुतीन यांची मॉस्को बाहेरची ही पहिली भेट आहे.
युक्रेनियन शस्त्रास्त्र डेपो नष्ट केला - रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मेजर जनरल इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी सांगितले की, लष्कराने खमेलनित्स्की येथील स्टारोकोस्टिंटिनिव येथे शस्त्रास्त्रांचा डेपो आणि युद्धविमानांसाठी प्रबलित हँगर नष्ट करण्यासाठी हवाई आणि समुद्रातून प्रक्षेपित क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. ते पुढे म्हणाले की दुसर्या हल्ल्याने कीवजवळ ह्व्रिलिव्हका येथे युक्रेनियन शस्त्रास्त्र डेपो नष्ट केला आहे.