महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Russia Ukraine Crisis : युक्रेनचा रशियापुढे लागणार का टिकाव? जाणून घ्या दोन्ही देशांकडील सैन्यदलाचे सामर्थ्य - Impact Of Russia Ukrane War On India

सोव्हियत युनियनच्या विघटनानंतर युक्रेनकडे आण्विक अस्त्रे आली होती. आण्विक अस्त्रांचा सर्वाधिक साठा असलेल्या देशात युक्रेनचा तिसरा क्रमांक होता. आण्विक अस्त्र बंद करण्याचा निर्णय युक्रेनने 1994 मध्ये घेतला होता. युक्रेनने आण्विक शस्त्रबंदीच्या करारावर 1994 मध्ये सहभाग घेतला. सर्व आण्विक अस्त्रे युक्रेनने रशियात नष्ट केली आहेत.

Military Capabilities Of Russia and Ukraine
रशिया व युक्रेनकडील सैन्यदलाचे सामर्थ्य

By

Published : Feb 24, 2022, 7:30 PM IST

नवी दिल्ली - रशियाने युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या दोन प्रांताना स्वतंत्र देश असा दर्जा दिल्याचे जाहीर केले. त्यानंतर रशियाच्या सैन्यदलाने थेट युक्रेनवर हल्ला केला आहे. युक्रेन हा देश पूर्वी सोव्हित युनियन या संघराज्य नावाने असलेल्या रशियाचा भाग होता. सध्या, या दोन्ही देशांमधील सैन्यदलाचे सामर्थ्य चर्चेत आले आहे. पाहू, दोन्ही देशांकडील सैन्यदलाचे सामर्थ्य

असे आहे युक्रेनकडील सैन्यदलाचे सामर्थ्य (Military Capabilities Of Ukraine )

युक्रेनने आजवर आण्विक अस्त्राचे कधीही प्रदर्शन केले नाही. मात्र, युक्रेनकडे अंदाजे 5 हजार आण्विक अस्त्रे असल्याचा अंदाज होते. युक्रेन 1991 पूर्वी सोव्हियत युनियनचा भाग होता. मात्र, सोव्हियत युनियनचे तुकडे पडल्यानंतर युक्रेन हा स्वतंत्र देश अस्तित्वात आला होता. सोव्हियत युनियनच्या विघटनानंतर युक्रेनकडे आण्विक अस्त्रे आली होती. आण्विक अस्त्रांचा सर्वाधिक साठा असलेल्या देशात युक्रेनचा तिसरा क्रमांक होता. आण्विक अस्त्र बंद करण्याचा निर्णय युक्रेनने 1994 मध्ये घेतला होता. युक्रेनने आण्विक शस्त्रबंदीच्या करारावर 1994 मध्ये सहभाग घेतला. सर्व आण्विक अस्त्रे युक्रेनने रशियात नष्ट केली आहेत.

देशाचे सामर्थ्य रशिया युक्रेन
लोकसंख्या 14,23,20,790 4,37,45,640
उपलब्ध मनुष्यबळ 6,97,37,187 2,23,10,276
सक्रिय कर्मचारी 8,50,000 2, 00,000
राखीव कर्मचारी 250,000 250,000
निमलष्कर दल 2,50,00 50,000
लढाऊ विमाने 772 69
हेलिकॉप्टर 1,543 112
लढाऊ हेलिकॉप्टर 544 34
लढाऊ रणगाडे 12,420 2,596
लढाऊ वाहने 30,122 12,303
पाणबुड्या 70 0
विमानतळे 1,218 187

रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या युद्धजन्य ( Russia Ukrane War ) स्थिती आहे. अशात रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास याचे गंभीर परिणाम अनेक देशांना भोगावे लागतील. त्यापैकी एक भारतही असेल, त्यामुळे रशिया युक्रेन युद्ध हे भारतासाठीही मोठं ( Impact Of Russia Ukrane War On India ) संकट असणार आहे.

हेही वाचा-Vladimir Putin : व्लादिमीर पुतिन अमेरिका नाटो चर्चा करण्यास उत्सुक

असे आहे रशियाकडील सैन्यदलाचे सामर्थ्य (Military Capabilities Of Russia )

आण्विक शस्त्रांचे संशोधन आणि विकासामध्ये रशिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. सोव्हित युनियनने पहिली आण्विक चाचणी 1949 मध्ये घेतली. त्यामुळे पश्चिम युरोपमध्ये रशियाचा दबदबा निर्माण झाला. प्रत्यक्षात 1953-54 पर्यंत रशियाकडे आण्विक शस्त्रास्त्रे नसावीत, असा पश्चिमेकडील देशांचा समज होता. रशियाकडे अमेरिकेच्या तुलनेत अधिक म्हणजे सुमारे 6490 सुसज्ज शस्त्रास्त्रे आहेत. रशियाने 700 आण्विक चाचण्या घेतल्या आहेत. सोव्हित युनियनने एकेकाळी झार हा जगातील सर्वात मोठा बॉम्ब तयार केला होता. त्यामध्ये 50 मेगाटनची स्फोटके होती.

हेही वाचा-Joe Biden will meet Vladimir Putin : युद्ध टाळण्यासाठी जो बायडेन आणि व्लादिमिर पुतिन भेट घेणार

नेमका काय आहे वाद? -

'नाटो'च्या मुद्यावरून रशिया युक्रेनमध्ये सध्या तणावाची स्थिती आहे. युक्रेनने 'नाटो'चे सदस्यत्त्व मिळण्याची मागणी केली आहे. यावर रशियाने आक्षेप घेतला आहे. युक्रेनला 'नाटो'चे सदसत्त्व मिळाल्यास आमच्या सुरक्षेला कायमचा धोका असेल, असं रशियाचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे याप्रकरणात अमेरिकेनेही युक्रेनचं समर्थन केलं आहे. युक्रेन हा सार्वभौम देश असून त्यांच्या देशासाठी योग्य तो निर्णय घेण्याचे त्यांना स्वतंत्र आहे, असं अमेरिकेनं म्हटलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details