नवी दिल्ली:काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाने निलंबित भाजप नेत्या नुपूर शर्मा यांच्या पैगंबर यांच्या विरोधातील टिप्पणीवर निरीक्षण नोंदवले. "देशभरातील भावना भडकवण्यास त्या एकट्याच जबाबदार" असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. ते योग्यच आहे आणि सत्ताधारी पक्षाला त्याची लाज वाटली पाहिजे अशी काँग्रेसची प्रतिक्रिया आहे.
रमेश यांची तीव्र प्रतिक्रिया - शर्मा विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या निरिक्षणानंतर एका निवेदनात काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, न्यायालयाने “विध्वंसक फूट पाडणार्या विचारसरणी” विरुद्ध लढण्याचा पक्षाचा संकल्प अधिक बळकट केला आहे. रमेश म्हणाले, "देशभरातील भावना भडकवण्यास एकट्याने जबाबदार असल्याबद्दल न्यायालयाने भाजपच्या प्रवक्त्याला अतिशय योग्यरित्या खडसावले आहे. तिने संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे," असे रमेश म्हणाले. "सर्वोच्च न्यायालयाच्या या टिपण्णीने, सत्तेत असलेल्या पक्षाला शरमेने मान खाली घालावी लागेल," असेही ते म्हणाले. सुप्रीम कोर्टाने प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात "विचलित करणाऱ्या" टिप्पणीबद्दल शर्मा यांना फटकारले आणि म्हटले की यामुळे दुर्दैवी घटना घडल्या आणि देशभरात भावना भडकल्या.