महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तामिळनाडू: आंबेडकर आणि अब्दुल कलाम हे कोणत्या वर्णाचे होते? पाठ्यपुस्तकातील प्रश्नामुळे वाद!

चेन्नईच्या चिन्मय मिशनने (chinmaya mission) तयार केलेल्या इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात लोकांचे त्यांच्या वर्णाच्या आधारे विभाजन केले आहे. बाबासाहेब आंबेडकर (ambedkar), माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम (abdul kalam) हे कोणत्या जातीचे आहेत, असा प्रश्न या पाठ्यपुस्तकात विचारण्यात आला आहे. (ambedkar and abdul kalam caste related question).

chinmaya mission
chinmaya mission

By

Published : Oct 3, 2022, 9:42 AM IST

चेन्नई: चेन्नईच्या चिन्मय मिशनने (chinmaya mission) तयार केलेल्या इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात लोकांचे त्यांच्या वर्णाच्या आधारे भेद केला आहे. हा भेद ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अश्या चार वर्गात करण्यात आले आहे. या विभाजनाच्या आधारावर बाबासाहेब आंबेडकर, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आदी कोणत्या जातीचे आहेत, असा प्रश्न पाठ्यपुस्तकात विचारण्यात आला आहे (ambedkar and abdul kalam caste related question).

chinmaya mission

काय आहे चिन्मय मिशन? : चिन्मय मिशन ही एक हिंदू धार्मिक संघटना आहे जी देशभरात अनेक शैक्षणिक संस्था चालवते. ती शाळांसाठी पाठ्यपुस्तकांचे उत्पादन आणि पुरवठा देखील करते. या प्रकरणात चेन्नईच्या क्रोमपेट येथील विवेकानंद विद्यालय शाळेत चिन्मय मिशनने उत्पादित केलेल्या पुस्तकांचा वापर केला आहे. समानता शिकण्याच्या वयात लहान मुलांच्या मनात प्रतिगामी असणाऱ्या वर्णभेदाच्या आधारे प्रश्न विचारण्यात आल्याचा आरोप चिन्मय मिशनवर होतो आहे.

chinmaya mission book

ABOUT THE AUTHOR

...view details