तारौबा (त्रिनिदाद) : भारताने पहिल्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 68 धावांनी पराभव ( India Wins ) केला. या सामन्यात संघाच्या विजयाचा हिरो ठरला कर्णधार रोहित शर्मा. रोहितने ६४ धावांची ( Rohit Played Brilliant Innings ) जबरदस्त इनिंग खेळली. टीम इंडियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 190 धावा केल्या, प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजला 20 षटके खेळून केवळ 122 धावा करता आल्या. वेस्ट इंडिजने त्यांच्या 8 विकेट गमावल्या, पण अखेरीस टीम इंडियाने हा सामना 68 धावांनी जिंकला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
191 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाने सुरुवातीपासूनच विकेट गमावण्यास सुरुवात केली. अर्शदीप सिंगने प्रथम काईल मायर्सला बाद केले, त्याच्यानंतर जेसन होल्डरही खाते न उघडताच बाद झाला. रविचंद्रन अश्विन आणि रवी बिश्नोई ही जोडी विंडीजसाठी दुःस्वप्न ठरली. दोन्ही फिरकीपटूंनी एकूण चार विकेट घेतल्या. अश्विनने 4 षटकात केवळ 22 धावा दिल्या आणि 2 बळी घेतले. तर रवी बिश्नोईने 4 षटकात 26 धावा देत फक्त 2 विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजकडून एस. ब्रुक्सने 20, कर्णधार निकोलस पूरनने 18 धावा केल्या.