महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 8, 2020, 8:03 PM IST

ETV Bharat / bharat

काश्मीरच्या शोपियानमध्ये बँकेच्या कॅश व्हॅनमधून 60 लाखांची लूट

सूत्रांनी सांगितले की, लुटारूंचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. बँक अधिकाऱ्यांनी सांगितले की, लुटलेली रक्कम 60 ते 80 लाख रुपयांपर्यंत असू शकते. नेमकी किती रक्कम लुटली याची पडताळणी केली जात आहे.

जम्मू-काश्मीर शोपियान न्यूज
बँकेच्या कॅश व्हॅनमधून 60 लाखांची लूट

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी बँकेची रोख रक्कम असलेल्या व्हॅनमधून अंदाजे 60 लाख रुपयांची लूट केली. जम्मू-काश्मीर बँकेच्या कॅश व्हॅनवर चार बंदूकधार्‍यांनी हल्ला केला आणि पैसे लुटले अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. ही घटना गुरुवारी घडली.

हेही वाचा -जम्मू काश्मिरच्या कठुआ परिसरात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

सूत्रांनी सांगितले की, लुटारूंचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. बँक अधिकाऱ्यांनी सांगितले की, लुटलेली रक्कम 60 ते 80 लाख रुपयांपर्यंत असू शकते. नेमकी किती रक्कम लुटली याची पडताळणी केली जात आहे.

हेही वाचा -काश्मीर : माचिल भागात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा; एका जवान हुतात्मा

ABOUT THE AUTHOR

...view details