पटना:बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. या वेळी त्यांची चर्चा बिहार पेक्षा महाराष्ट्रात जास्त होत आहे. महाराष्टाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची तुलना राबडी देवींसोबत करण्यात आली आहे. या नंतर वाद वाढला महाराष्ट्रा पाठाेपाठ बिहारमधे पोचला (Marathi Rabri Devi Controversy in Bihar) असुन राजदने चांगलाच समाचार घेतला आहे.
बिहारच्या मुख्यमंत्री पदी 7 वर्षे राहिलेल्या राबडी देवी बिहार विधान परिषदेच्या सदस्य आहेत. महाराष्ट्र भाजपच्या सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारियांनी राबडी देवीच्या फोटो सोबत रश्मी ठाकरेंचा फोटो समाज माध्यमावर शेयर करत लिहीले होते 'मराठी राबजी देवी' या प्रकारानंतर हा वाद वाढला. गजारियांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
तीकडे बिहार मधे राष्ट्रीय जनता दलाने या प्रकाराबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. राजद प्रवक्ता शक्ती सिंह यादव यांनी म्हणले आहे की, 'कोणालाही माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या विषयी काहीही टिप्पनी करताना एकदा विचार करायला हवा होता त्या बिहारच्या एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत.भाजप नेत्यांनी कोणत्या मुद्यावर राबडी देवींना ट्रोल केले ते तेच जाणत असतील, पण हे चुकीचे आहे '