गुवाहाटी - सध्या आमच्यासोबत 6-7 अपक्ष आमदारांसह 46 आमदार आहेत. अपक्ष आमदार सोडता बाकीचे शिवसेनेचे आमदार आहेत. हा आकडा येणाऱ्या काळात वाढेल. आत्तापर्यंत आम्हाला भाजपकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही किंवा आम्ही त्यांच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी ही माहिती एएनआयला दिली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर मी म्हणेन की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत आणि यापुढेही शिवसैनिक राहू. सध्या तरी आम्ही शिवसेना किंवा मुख्यमंत्र्यांशी कोणतीही चर्चा करत नाही आहोत. आम्ही भविष्यातील कृतीबाबत अजूनही निर्णय घेतलेला नाही असेही एकनाथ शिंदे म्हणाले. सूरतमध्ये आज दुपारी गेलेले तीन शिवसेना आमदारही गुवाहाटीला पोहोचत आहेत. तिथे संध्याकाळी एक बैठक होणार आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे त्यांच्या पुढील राजकारणाची दिशा माध्यमांना सांगू शकतात.
रात्रीच शिवसेनेत बंडखोरी करून आपल्या समर्थक ३५ आमदारांसह नाराज असलेले मंत्री एकनाथ शिंदे हे आसामची राजधानी गुवाहाटी येथे दाखल झाले ( Eknath Shinde arrives in Guwahati ) आहेत. तेथे रॅडीसन ब्लू हॉटेलमध्ये या सर्व आमदारांची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवसेनेत बंडखोरी करून आपल्या समर्थक आमदारांसह नाराज असलेले मंत्री एकनाथ शिंदे सुरतेहून थेट आसामात गेले आहेत ( Eknath Shinde arrives in Guwahati ) . तेथे हॉटेलमध्ये सर्व आमदारांची व्यवस्था करण्यात आली आहे. गुवाहाटी विमानतळावर पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मोठा दावा केला होता. शिवसेनेचे ४० आमदार माझ्यासोबत गुवाहाटीमध्ये दाखल झाले असल्याचे ते म्हणाले होते. दुपारी त्यांनी त्यामध्ये वाढ होऊन हे आमदार 46 झाल्याचे म्हटले आहे. तसेच मी कुणावरही टीकाटिप्पणी करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्त्व आम्ही पुढे घेऊन जाणार असे शिंदे ( Eknath Shinde Claims ) यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेना आणि अपक्ष असे मिळून 35 हून अधिक आमदार सोमवारी रात्री सुरतला पोहोचले होते. बुधवारी रात्री सुरत विमानतळावरून ते सर्व गुवाहाटीकडे रवाना झाले. सकाळी ६ च्या सुमारास हे सर्व आमदार आसामची राजधानी गुवाहाटी येथे पोहोचले ( Eknath Shinde arrives in Guwahati ) आहेत.