मुंबईदेशात सुमारे 20 लाख मंदिरे असतील. काही मंदिरे आपल्या रचनेमुळे जगप्रसिद्ध आहेत, तर काही मंदिरे मूर्तीमुळे. काही तिथे जाणाऱ्या भाविकांच्या संख्येसाठी प्रसिद्ध आहेत, तर काही तिथे मिळणाऱ्या प्रसादामुळे. अशाच काही मंदीरांविषयी जाणून घेणार आहोत. अलीकडेच, एका मंदिराला जानेवारी 2021 ते 30 डिसेंबर 2021 पर्यंत 833 कोटींची देणगी मिळाली आहे. चला तर मग जाणून घेऊया या मंदिरासोबत देशातील इतर श्रीमंत मंदिरांबद्दल.
तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर ( Tirupati Temple ) हे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात भगवान व्यंकटेश्वर किंवा बालाजी भगवान विष्णूची मूर्ती स्थापित आहे. 1 जानेवारी 2021 ते 30 डिसेंबर 2021 पर्यंत या मंदिरातील दानपेटीत 833 कोटी रुपये देणगी स्वरूपात आली आहे. हिंदुस्थानातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या या मंदिरात तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टचे 9 हजार किलो सोने आहे. यातील 7,235 किलो सोने देशातील 2 बँकांकडे आणि 1,934 किलो सोने ट्रस्टकडे आहे. दरवर्षी सुमारे 1000-1200 कोटींचा प्रसाद या मंदिरात येतो.
पद्मनाभस्वामी मंदिरहे देशातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे आणि या मंदिराची संपत्ती सुमारे 20 मिलियन डॉलर्स म्हणजेच 1,48,681 कोटींहून अधिक आहे. पद्मनाभ स्वामी मंदिर ( PadmanabhaSwamy Temple) केरळमधील तिरुवनंतपुरम शहरात आहे. या मंदिराचा खजिना मोठा आहे, त्यात सोने, हिरे-रत्नाचा समावेश आहे.
साईबाबा मंदिरशिर्डी येथे असलेले साईबाबांचे मंदिर ( Sai Baba Temple) हे देशातील तिसरे सर्वात श्रीमंत मंदिर आहे. मंदिराच्या बँक खात्यात सुमारे 32 कोटींचे सोने आहे. तर 4428 किलो चांदी आणि सुमारे 1,800 कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत. या मंदिरात दरवर्षी सुमारे 360 कोटी रुपये देणगी स्वरूपात येतात. सर्व सणांना भाविक मंदिरात गर्दी करतात.
कामाख्या मंदिरगुवाहाटीतील कामाख्या देवी मंदिर ( Kamakhya Temple ) हे भारतातील सर्वात प्रमुख शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. एका गुहेच्या आत मूर्ती आहे. जी पवित्र मानली जाते. देशभरातून लोक दरवर्षी या मंदिराला भेट देतात. अगदी नवरात्रोत्सव देखील येथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दरम्यान मंदिरात मोठी गर्दी दिसून येते. महिला वर्गासह पुरूषांचाही मोठ्या संख्येने सहभाग असतो.
माता वैष्णो देवी मंदिरवर्षभर शेकडो आणि हजारो यात्रेकरू जम्मू - काश्मीरच्या कटरा जिल्ह्यातील वैष्णो देवीला भेट ( Vaishno Devi Temple ) देतात. हे देशातील 108 शक्तीपीठांपैकी एक आहे. देवी वैष्णो देवी दुर्गा देवीचे रूप असल्याचे मानले जाते. मंदिराच्या पवित्र गुहेच्या आत खडकांच्या स्वरूपात मूर्ती आहे. भक्त सहसा कटरा पासून 13 किमीचा डोंगर चढतात आणि मंदिरावाहेर नेहमी भाविकांच्या लांब रांगा लागलेल्या असतात.
महाकाली देवी मंदिर मध्य प्रदेशातील क्षिप्रा नदीच्या काठावर प्राचीन शहर उज्जैनमधील एका छोट्या टेकडीवर महाकाली ( Mahakali Devi Temple ) देवीचे मंदिर आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, सती देवीचा एक भाग ज्या ठिकाणी आढळला. देवीच्या वरच्या ओठांचा भाग त्या ठिकाणी पडला होता. त्या ठिकाणी हे मंदिर आहे. ग्रह कालिका, महालक्ष्मी आणि सरस्वती ही इतर देवी रूपे आहेत. ज्यांची तिथे पूजा केली जाते.
कालीघाट मंदिरकोलकाताच्या कालीघाट मंदिरात ( Kalighat Kali Temple ) नवरात्री दरम्यान दुर्गा पूजा मोठ्या उत्साहात केली जाते. लोकप्रिय मान्यता अशी आहे की आज जेथे हे मंदिर आहे. तेथे देवी सतीच्या उजव्या पायाचे बोट पडले होते. कालीघाट मंदिरात एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यात हजारो भाविकांची गर्दी असते. हे प्रमूख मंदिर 2000 वर्षांहून अधिक जुने आहे. देशभरासह परदेशातून भाविक नवरात्रीत येथे भेट देतात.
चामुंडेश्वरी मंदिरचामुंडेश्वरी मंदिरहे म्हैसूरमधील चामुंडी टेकड्यांच्या माथ्यावर वसलेले आहे ( Chamundeshwari Temple ). येथे सतीचे केस पडले असे म्हटले जाते आणि नंतर 12 व्या शतकात होयसला शासकांनी देवीच्या नावाने मंदिर बांधले. या मंदिराला भेट द्या आणि त्याच्या भव्य वास्तुकलेचा आनंद घ्या.
श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर या मंदिरात लाल दगडांचा वापर करून जैन धर्मातील तीर्थंकरांच्या अनेक मूर्त्या घडवलेल्या पाहायला मिळतात. या मंदिरात उपासना आणि नामस्मरण करण्यासाठी महिलांना विशेष ड्रेसकोड देण्यात आला आहे. नेमून दिलेल्या पेहरावाशिवाय येथे महिलांना प्रवेश दिला जात नाही.हे जैन मंदिर मुख्यत्वे करून भगवान शांतिनाथ यांना समर्पित आहे. मध्य प्रदेशातील गुना येथील एक प्राचीन जैन मंदिर आहे. या मंदिराचे मूळ नाव श्री शांतिनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र असे आहे. हे मंदिर इ.स. १२३६ मध्ये बांधण्यात आले होते.
कार्तिकेय मंदिरराजस्थानातील पुष्कर हे अतिशय प्रसिद्ध असे ठिकाण आहे. कारण या एकाच ठिकाणी ब्रह्मदेवाचेही मंदिर आहे.दुसऱ्या अन्य ठिकाणी ब्रह्मदेवाचेही मंदिर आहे. या मंदिरात महिलांना पूर्णपणे प्रवेश निषिद्ध आहे. कारण या मंदिरात कार्तिकेयांचे बह्मचारी स्वरुपात पूजन केले जाते. एका प्राचीन मान्यता आणि आख्यायिकेनुसार, कार्तिकेयांचे ब्रह्मचारी स्वरुपात पूजन होत असल्यामुळे महिलांना प्रवेश नाकारण्यात येतो. एखाद्या महिलेने मंदिरात प्रवेश केल्यास तिला शाप मिळतो. त्यामुळे कोणतीही महिला या मंदिरात दर्शनासाठी जात नाही, असा दावा केला जात असल्याचे सांगितले जाते.
शबरीमला मंदिरशबरीमाला मंदिर हे केरळ राज्यात आहे. पथनामथिट्टा जिल्ह्यातील पेरियार व्याघ्र प्रकल्पाच्या आत शबरीमाला टेकडीवर हे मंदिर आहे. दरवर्षी 40 ते 50 दशलक्ष पेक्षा जास्त भाविक या मंदिराला भेट देतात. असे हे जगातील सर्वात मोठ्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. वर्षभरात केवळ १४ जानेवारी आणि १५ नोव्हेंबर या दोन दिवशी मंदिर भाविकांसाठी खुले होते. हे मंदिर शबरीमला पर्वतावर असून, पुरुष अनवाणी या शिखरावर चढून जातात. यावेळी ४१ दिवसांचे व्रत आचरले जाते.
माता मावलीछत्तीसगडमध्ये बालौदाबाजार जिल्ह्यात माता मावली नावाचे देवीचे मंदिर आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक, श्रद्धाळू या मंदिरात दर्शनासाठी येतात.सुमारे ४०० वर्षांपूर्वीच्या या मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही. नवरात्रींमध्ये तर मंदिरात भाविकांचा ओघ अद्भूतपूर्व असतो. नवरात्रात या मंदिरात १६६ दिवे लावण्याची परंपरा आहे. देवीचे मंदिर असूनही या मंदिरात महिलांना प्रवेश नाकारला जातो, ही थक्क करणारी बाब मानली जात आहे.