नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेल दरवाढीने सामान्य नागरिक त्रासले असताना आता खाद्य तेलाच्या वाढत्या दराने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. खाद्यतेलांचे गगनाला भिडलेले भाव आटोक्यात आणण्यासाठी सरकारने देशांतर्गत बाजारात खाद्यतेल व्यापाऱ्यांना 31 मार्च 2022 पर्यंत तेलाचा साठा करण्यावर मर्यादा आणली आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात खाद्यतेलाची साठेबाजी करणाऱ्यांवर वचक बसणार आहे.
व्यापाऱ्यांकडील खाद्यतेलाच्या साठ्यांवर निर्बंध -
गेल्या एका महिन्याच्या कालावधीत खाद्य तेलाचे भाव 20 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून येते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेल्या किमती या देशातील खाद्य तेलाच्या किंमती वाढण्यास कारणीभूत असल्याचे भारतीय उद्योग मंडळाने सांगितले होते. यावर आता केंद्र सरकारने देशातील खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने व्यापाऱ्यांकडील खाद्यतेलाच्या साठ्यांवर निर्बंध लादल्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या निर्बधांमुळे देशांतर्गत बाजारपेठेमध्ये खाद्यतेलाच्या किमती कमी होणार असल्याचेही केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसे निर्देशही सर्व राज्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तेलाच्या किंमतीत 15 ते 20 रुपयांची वाढ -