किन्नौर (हिमाचल प्रदेश) - जिल्ह्यातील निगुलसारी मध्ये झालेल्या दरड कोसळल्याने आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिसऱ्या दिवशी सकाळी चार वाजेपासून बचावकार्य सुरू झाले आहे. तर आज सकाळी आणखी दोन मृतदेह मिळून आले आहेत. याआधी गुरूवारी सकाळी चार आणि बुधवारी दहा मृतदेह मिळून आले होते. या दुर्घटनेत 13 जण जखमी झाले आहेत. यात दोन गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अजूनही अनेक जण बेपत्ता आहेत. गुरुवारी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच पीडितांच्या नातेवाईकांच्या संवाद साधला.
गुरुवारी किन्नौरहून शिमला येथे आल्यावर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी यासंबंधीची बातमी सभागृहात दिली. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सांगितले की, दरड कोसळत असल्याने गुरुवारी सकाळी शोधमोहीम थांबविण्यात आली होती. ते म्हणाले, घटना घडल्यानंतर लगेचच तेथे जायची इच्छा झाली होती. मात्र, हवामान खराब असल्याने तिथे जाऊ शकलो नाही. तर तेच किन्नौरचे आमदार जगत सिंह नेगी आणि माजी आमदार तेजवंत सिंह नेगी हेदेखील मुख्यमंत्र्यासोबत उपस्थित होते.