महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारतात कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच; 841 नवीन रुग्ण, 'अशी' घ्या खबरदारी - Covid cases in India

New Corona Cases in India : भारतात कोरोना विषाणूचे रुग्ण हळूहळू वाढत आहेत. (Covid cases in India) देशात गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 841 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. (Corona virus)

New Covid Cases
कोविड

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 31, 2023, 7:22 PM IST

नवी दिल्लीNew Corona Cases in India : भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 841 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जी गेल्या 227 दिवसांतील सर्वाधिक आहे. उपचाराधीन संसर्गाची प्रकरणे 4,309 आहेत. आरोग्य मंत्रालयाने रविवारी ही माहिती दिली. (COVID Infection India)

'या' कारणाने संसर्गामध्ये वाढ:मंत्रालयाने सकाळी 8 वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत केरळ, कर्नाटक आणि बिहारमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा संसर्गामुळे मृत्यू झाला. यापूर्वी 19 मे रोजी देशात संसर्गाची 865 नवीन प्रकरणे समोर आली होती. सर्दी आणि विषाणूच्या नवीन उपप्रकारांमुळे अलिकडच्या दिवसांत संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी 5 डिसेंबरपर्यंत दैनंदिन प्रकरणांची संख्या दुहेरी अंकांवर आली होती. 2020 च्या सुरुवातीपासून गेल्या चार वर्षांत देशभरात 4.5 कोटींहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि 5.3 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी काही लोकांचा मृत्यूही झाला.

काय सांगते मंत्रालयीन वेबसाईट:आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, आतापर्यंत संसर्गातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4.4 कोटींहून अधिक झाली आहे. राष्ट्रीय पुनर्प्राप्ती दर 98.81 टक्के आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात कोविड-19 विरोधी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 220.67 कोटी डोस देण्यात आले आहेत.

कोरोनापासून बचावासाठी अशी घ्या खबरदारी:

1) दिवसातून वारंवार हात स्वच्छ धुवावेत. यासाठी साबण किंवा अल्कोल मिश्रित असलेली जंतुनाशकांचा (हॅण्डवॉश) वापर करावा.

2) खोकताना आणि शिंकताना टिशू पेपरचा वापर करावा. ज्याद्वारे नाक-तोंड झाकले जाईल. त्यानंतर ते ताबडतोब कचऱ्यात टाकून द्या आणि आपले हात स्वच्छ धुवा.

3) ज्याला ताप आणि खोकला आहे, त्याच्याशी जवळचा संपर्क टाळा.

4) जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण येत असेल तर तत्काळ वैद्यकीय सेवा घ्याव्यात. तुम्ही कोठून प्रवास केला असेल त्याची माहिती डॉक्टरांना सांगा.

5) कोरोनाचा संसर्ग झाला आहे अशा ठिकाणच्या भागातील जिवंत प्राणी आणि त्यांनी स्पर्श केलेल्या पृष्ठभागाशी थेट असुरक्षित संपर्क टाळावा.

6) कच्चे किंवा न शिजवलेल्या प्राण्यांच्या उत्पादनांचे (मांस) सेवन करू नका. कच्चे मांस, दूध किंवा जनावरांच्या अवयवांना काळजीपूर्वक हाताळा जेणेकरून न शिजवलेल्या पदार्थांचा संसर्ग होऊ नये.

हेही वाचा:

  1. जयंत पाटलांमुळं महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता, आमदार संजय शिरसाट यांचा दावा
  2. नववर्षाच्या स्वागतासाठी साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, पाहा व्हिडिओ
  3. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल, साई मंदिर आज राहणार रात्रभर खुलं

ABOUT THE AUTHOR

...view details