मकर संक्रांत हा सण सनातन धर्मातील प्रमुख सण मानला जातो. जेव्हा सुर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. यंदा मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारीला साजरा होत आहे. ज्योतिष्यशास्त्रानुसार सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याला 'मकर संक्रांत' म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगास्नान आणि दान करणे, अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी केलेले गंगास्नान हे महास्नान असल्याचे मानले जाते. तसेच या दिवशी खिचडी खाण्याला विशेष महत्व आहे.
का खल्ली जाते खिचडी :ज्योतिष्यशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी हे मुख्य अन्न मानले जाते. धार्मिक दृष्टिकोनातून या दिवशी खिचडी खाणे खूप शुभ असते. यातुन सर्व त्रास दूर होतात. याशिवाय खिचडीचा संबंध अनेक ग्रहांशी जोडला गेला आहे. खिचडीमध्ये वापरण्यात येणारा भात हा चंद्राशी संबंधित आहे. खिचडीत टाकली जाणारी उडदाची डाळ शनिदेवाशी संबंधित आहे. खिचडीतील तूप सूर्यदेवाशी संबंधित आहे. म्हणुनच मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाणे खूप महत्वाचे मानले जाते. या दिवशी खिचडी खाण्याबरोबरच दान करणे देखील तेवढेच महत्वाचे सांगितलेले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ आणि उडीद डाळ दान केली जाते, असे करणे अत्यंत शुभ मानले जाते.