महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Kedarnath Yatra : केदारनाथ यात्रेची नोंदणी 10 जूनपर्यंत थांबवली, खराब हवामान आणि गर्दीमुळे सरकारचा निर्णय - केदारनाथ

उत्तराखंड सरकारने केदारनाथ यात्रेच्या नोंदणीवर पुन्हा एकदा बंदी घातली आहे. खराब हवामान आणि भाविकांची वाढती गर्दी पाहता ही बंदी घालण्यात आली आहे. मात्र, ज्यांची नोंदणी आधीच झाली आहे, ते धामला जाऊन दर्शन घेऊ शकतात.

Kedarnath
केदारनाथ

By

Published : Jun 5, 2023, 3:04 PM IST

डेहराडून (उत्तराखंड) : केदारनाथमध्ये खराब हवामान आणि यात्रेकरूंची प्रचंड गर्दी लक्षात घेता उत्तराखंड सरकारने केदारनाथ यात्रेच्या ऑफलाइन आणि ऑनलाइन नोंदणीवर 10 जूनपर्यंत बंदी घातली आहे. मात्र, ज्या भाविकांची नोंदणी आधीच झाली आहे, ते केदारनाथ धामला जाऊन दर्शन घेऊ शकतात.

केदारनाथ यात्रेच्या नोंदणीवर बंदी

या वर्षी रेकॉर्डब्रेक गर्दी : या वर्षी चारधाम यात्रेतील भाविकांची संख्या पूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडेल, अशी आशा उत्तराखंड सरकारने आधीच व्यक्त केली होती. आता तसे होताना दिसत आहे. आतापर्यंत तब्बल 20 लाखांहून अधिक भाविकांनी उत्तराखंडमधील चारधामला भेट दिली आहे, तर 40 लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. दुसरीकडे केदारनाथ धामबद्दल सांगायचे झाले तर, हवामानासह इतर सर्व अडचणींवर मात करत मोठ्या संख्येने बाबांचे भक्त दर्शन घेण्यासाठी केदारनाथ धाम गाठत आहेत.

केदारनाथ धाममध्ये भाविकांची गर्दी :सरकारी आकडेवारीवर नजर टाकली तर आतापर्यंत 7 लाख 13 हजार भाविकांनी बाबा केदारनाथचे दर्शन घेतले आहे. अशा स्थितीत केदारनाथ धाममध्ये भाविकांची वाढती संख्या सांभाळणे प्रशासनाला थोडे अवघड जात आहे. यामुळेच भाविकांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी सरकारला वेळोवेळी नोंदणी थांबवावी लागते आहे.

22 एप्रिलला सुरू झाली यात्रा : 22 एप्रिलला गंगोत्री - यमुनोत्री धामचे दरवाजे उघडल्यानंतर उत्तराखंडची चारधाम यात्रा सुरू झाली. यानंतर 24 एप्रिलला केदारनाथ धाम आणि 27 एप्रिलला बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले. सध्या केदारनाथ धाम आणि हेमकुंड साहिबमधील भाविकांसमोर हवामानाचे सर्वात मोठे आव्हान आहे. दोन्ही धामपर्यंत पोहोचण्यासाठी यावेळी भाविकांना हिमनदीतून जावे लागते. रविवारी संध्याकाळी हेमकुंड साहिब पादचारी मार्गावर एक ग्लेशियर तुटला, ज्यामध्ये 6 यात्रेकरू अडकले. त्यापैकी 5 जणांना एसडीआरएफच्या टीमने वाचवले, मात्र एका महिलेचा मृत्यू झाला. हा मृतदेह सोमवारी सकाळी बाहेर काढण्यात आला.

हे ही वाचा :

  1. SDRF Rescues Youth In Kedarnath : केदारनाथला स्टंट करणे आले अंगलट; सुमेरु पर्वतावर अडकलेल्या तरुणाची एसडीआरएफकडून थरारक सुटका
  2. Melting Glaciers : केदारनाथसारख्या पुराचा धोका वाढला, हिमालयातील धोकायादायक तलावांची संख्या 995 वर पोहोचली!

ABOUT THE AUTHOR

...view details