नवी दिल्ली -स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 22 सप्टेंबर 2022 रोजी प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या भरतीसाठी नोंदणी सुरू आहे. पदवीधर विद्यार्थी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच शेवटच्या तारखेच्या (१२ ऑक्टोबर २०२२) पूर्वी स्वतःची नोंदणी करू शकतात. नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, प्राथमिक परीक्षा 17, 18, 19 आणि 20 डिसेंबर 2022 रोजी घेतली जाईल. जे विद्यार्थी (Sbi Po Recruitment 2022)प्राथमिक परीक्षेत पात्र ठरतील त्यांना SBI PO मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल त्यानंतर सायकोमेट्रिक चाचणी घेतली जाईल.
बँक सन 2022 साठी सुमारे 1673 रिक्त जागा भरत आहे. SBI PO 2022 साठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांची पदवी आणि वय 30 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असले पाहिजे. केंद्र सरकारच्या नियमांनुसार राखीव प्रवर्गासाठी उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाते. तुम्ही इतर महत्त्वाची माहिती येथे तपासू शकता. स्टेट बँकेने जारी केलेल्या SBI PO अधिसूचना 2022 नुसार, एकूण 1673 पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी ही प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे.