महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top News Today : एका क्लिकवर वाचा आजच्या महत्त्वाच्या बातम्या - नोटाबंदी याचिकेवर सुनावणी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा चंद्रपूर आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. ( JP Nadda on tour of Chandrapur and Aurangabad ) शिवाय आजपासून राज्यभरातील 7 हजारांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपावर जाणार ( Resident Doctor on strike ) आहेत. पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात होत असून धुळे जिल्ह्यात 3 हजाराहून अधिक अर्ज आले आहेत. 5 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मैदानी चाचणीला आज सुरुवात होणार असून कडकाच्या थंडीत उमेदवारांची गर्दी होणार आहे. राज्यातील हिंगोली, परभणी, यवतमाळ, भंडारा आणि अमरावती जिल्ह्यात ही भरती होणार आहे. यासह आज दिवसभरातील घडणाऱ्या महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर. ( Read Top News Today In Marathi )

Read Top News Today
आजच्या महत्त्वाच्या बातम्या

By

Published : Jan 2, 2023, 7:32 AM IST

मुंबई : जे पी नड्डा चंद्रपूर आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर : (JP Nadda on tour of Chandrapur and Aurangabad ) भाजपच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 45 (144) ची घोषणा केली आहे. यात १८ लोकसभा मतदारसंघ भाजपच्या हिट लिस्टवर आहेत. यापैकी दोन मतदारसंघात म्हणजे चंद्रपूर आणि औरंगाबादमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज दौरा करणार आहेत. औरंगाबादमध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर भाजपाची सभा होणार आहे. यावेळी जे.पी नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, भागवत कराड यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. ( Read Top News Today In Marathi )

राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर : (Resident Doctor on strike ) विविध मागण्यांसाठी मार्डने संपाचा इशारा दिलाय. अतिदक्षता विभाग वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्याचा संघटनेने इशारा दिला असून राज्यभरातील 7 हजारांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. शनिवार पर्यंत वेळ देउन देखील चर्चेचं निमंत्रण न मिळाल्याने आजपासून संघटना संपावर ठाम आहेत. राज्यातील सर्व शासकीय आणि महाविद्यालयात निवासी डॉक्टरांकडून निदर्शने केली जाणार आहेत. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील 172 डॉक्टर आजपासून काम बंद आंदोलन करणार आहेत. सोलापुरातील मार्ड संघटनेशी संबंधित संघटनाही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयातील दीडशे डॉक्टरांचाही संपात समावेश आहे.

पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणी : (Field Test for Police Recruitment ) पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात होत असून धुळे जिल्ह्यात 3 हजाराहून अधिक अर्ज आले आहेत. 5 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मैदानी चाचणीला आज सुरुवात होणार असून कडकाच्या थंडीत उमेदवारांची गर्दी होणार आहे. राज्यातील हिंगोली, परभणी, यवतमाळ, भंडारा आणि अमरावती जिल्ह्यात ही भरती होणार आहे.

पुण्यात नीलम गोऱ्हेंची पत्रकार परिषद : (Press Conference of Neelam Gore in Pune)शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषद होणार आहे.

शीझान खानचे वकील आणि बहिणीची पत्रकार परिषद :अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणातील ( Actress Tunisha Sharma's suicide case ) मुख्य संयित शीझान खानचे वकील आणि बहिणी पत्रकार परिषद घेणार आहेत.

वर्धा येथे लाक्षणिक उपोषण :वर्ध्यानजीक असलेल्या आलोडी ग्रामस्थांचे स्मशानभूमीसाठी लाक्षणिक उपोषण, निस्तार हक्क डावलून प्रशासनाने शासकीय रेकॉर्डवरून स्मशानभूमी हटविल्याची माहिती. त्यामुळे लाक्षणिक उपोषण होत आहे.

धुळ्यात सर्वपक्षीय घंटानाद आंदोलन :जिल्ह्यात कृषी विद्यापीठ व्हावे या मागणीसाठी सर्वपक्षीय घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे, जिल्हाधिकारी कार्यालयात हे आंदोलन होणार आहे.

मनाली विंटर कार्निवल 2023 :नवीन वर्षाच्या सुरुवातीसह, आजपासून मनाली या पर्यटन शहरामध्ये हिवाळी कार्निव्हल ( Manali Winter Carnival 2023 ) आयोजित करण्यात येणार आहे. 5 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात जिथे नृत्य सादर केले जाईल. तेथे 11 थीमवर टॅबलेक्स सादर केले जातील. विंटर क्वीन स्पर्धा मुख्य आकर्षणाचे केंद्र असेल. आज त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री सुखविंदर सिंग ( Chief Minister Sukhwinder Singh ) यांच्या हस्ते होणार आहे.

आजपासून CBSE च्या प्रात्यक्षिक परीक्षा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा जाहीर केल्या आहेत. CBSE ने आपल्या वेबसाईटवर याबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध केली आहे. इयत्ता 10वी आणि 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा ( 12th Practical Exam ) 2 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून सुरू होणार आहेत. जे 14 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

मुख्यमंत्री सुखविंदर सिंग यांचा दिल्ली दौरा :मुख्यमंत्री सुखविंदर सिंग आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान ते अनेक बड्या नेत्यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारमंथन करतील आणि काही दिवसांनी पुन्हा मंत्रिमंडळाची घोषणा केली जाईल. ( Delhi visit of Chief Minister Sukhwinder Singh )

नोटाबंदी याचिकेवर सुनावणी : ( Hearing on demonetisation petition ) सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ सहा वर्षांपूर्वी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या कायदेशीरतेवर निर्णय देणार आहे. न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर, न्यायमूर्ती बीआर गवई, न्यायमूर्ती एएस बोपण्णा, न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती बीव्ही नगररत्न यांचा समावेश असलेल्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने 7 डिसेंबर 2022 रोजी निर्णय राखून ठेवला होता. 3 जानेवारी रोजी निवृत्त होणारे पीठासीन न्यायाधीश न्यायमूर्ती नझीर यांचाही निकाल जाहीर होण्याची तारीख हा शेवटचा कामकाजाचा दिवस असेल. अशा परिस्थितीत नोटाबंदीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय 2 जानेवारी 2023 रोजी म्हणजेच आजच निकाल देऊ शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details