मुंबई :आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा (Top News Today) वाचा मोदींच्या हस्ते ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्पाचे उद्घाटन, रॉबर्ट वाड्रा शिर्डी आणि सिद्धिविनायक दर्शनाला, किरीट सोमैय्यांची पत्रकार परिषद, भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सामना, नाशिकमध्ये छटपूजा, राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यात मेळावा, संभाजीराजेंचा नाशिक दौरा, अंबादास दानवेंचा उस्मानाबाद दौरा या विशेष घडामोडी (Marathi News) आहेत.
आज मोदींच्या हस्ते ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्पाचे उद्घाटन(Transport aircraft project inaugurated by Modi today) :फॉक्सकॉन-वेदांता'नंतर आता आणखी एक महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूर येथे होणारा C-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट हा प्रकल्प आता गुजरातमध्ये होणार आहे. गुजरातमध्ये वडोदऱ्याला हा प्रकल्प होणार असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी आज मन की बात करणार आहेत. सकाळी 11 वाजता मन की बात का कार्यक्रम होईल.
आज रॉबर्ट वाड्रा शिर्डी आणि सिद्धिविनायक दर्शनाला (Robert Vadra Shirdi and Siddhivinayak visit today) : रॉबर्ट वड्रा आज शिर्डी आणि सिद्धिविनायकाला भेट देणार आहेत. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आज शिर्डीच्या दर्शनाला सकाळी 11 वाजता आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनाला दुपारी दीड वाजता जाणार आहेत.
आज किरीट सोमैय्यांची पत्रकार परिषद (Kirit Somaiya press conference) : आज किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद आहे. ते आज एसआरए घोटाळ्याची कागदपत्रे प्रसिद्ध करण्यासाठी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.