मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात. विदेशाप्रमाणाचे भारतातही तरुणांमध्ये क्रिप्टोकरन्सीचे मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. भारतात बीटकॉईनसह अन्य क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार उलाढाल होते. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे ( Bitcoin Rate Today ) तरुणांचा मोठ्या प्रमाणात कल ( Cryptocurrency Prices Today ) असते. आज बिटकॉइनची किंमत (Bitcoin price) 13,92,481 रूपये आहे. इथेरिअमची किंमत (price of Ethereum) 1,03,744 रूपये आहे. बायनान्सची किंमत (Price of Binance) 21,448 रूपये आहे.
Cryptocurrency Prices Today : वाचा आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर, जाणून घ्या क्रिप्टोकरन्सीचे फायदे आणि तोटे
भारतात बीटकॉईनसह अन्य क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार होऊ लागले आहेत. तरुणांमध्ये क्रिप्टोकरन्सीची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे ( Bitcoin Rate Today ) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष (Cryptocurrency Prices Today ) असते. आजचे बीटकॉईनचे दर जाणून घ्या. (Cryptocurrency Prices Today in India ) तसेच क्रिप्टोकरन्सीचे फायदे आणि तोटे जाणून घेवू (benefit and losses of cryptocurrency) या.
क्रिप्टोकरन्सीचे फायदे : क्रिप्टोकरन्सी हे एक सुरक्षित व गोपनीय पेमेंट सेवा पुरविणारे साधन आहे. हे ब्लॉक चेनवर आधारित कार्य करत असल्यामुळे यामध्ये सहसा फसवणुकीचे प्रकार घडत नाहीत. व्यवहार करताना फी कमी प्रमाणात राहते. व्यवहारावर बंधने (benefit of cryptocurrency) नाहीत. जगात कुठेही कोणत्याही व्यक्तीला पैशाची देवाणघेवाण करता येते. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून आपण दिवसाचे 24 तास आठवड्याचे 7 ही दिवस आणि वर्षाचे ३६५ दिवस कधीही व्यवहार करू शकतो. या व्यवहारांसाठी खातेवही तयार केले जाते. जगातील लाखो व्यापारीही बिटकॉइनने व्यवहार करतात. मात्र अद्याप कोणत्याही मध्यवर्ती बँकेने त्याला मान्यता दिलेली नाही. अमेरिकेतील अनेक मोठ्या कंपन्याही बिटकॉइन स्वीकारतात. इंटरनेटच्या जगात अनेक एक्सचेंज आहेत, जे ते खरेदी आणि विक्रीसाठी उपलब्ध करतात. इंटरनेटवरील अनेक वेबसाइट्स आणि अॅपद्वारे त्याची खरेदी आणि विक्री केली जाते. यामध्ये खरेदी-विक्री करणाऱ्यांची माहिती लपवली जाते. क्रिप्टोकरन्सीचे एक्सचेंज स्वरूप खूप सुरक्षित आहे. त्याचसोबतच याचा व्यवहार हा किफायतेशीर (benefit and losses of cryptocurrency) आहे.
क्रिप्टोकरन्सीचे तोटे : क्रिप्टोकरन्सीवर कोणाचेही नियंत्रण (Cryptocurrency Prices Today in India ) नाही. त्यामुळे आपल्यासोबत फ्रॉड झाल्यास आपण काहीच करू शकत नाही. क्रिप्टोकरन्सीमध्ये कोणत्याही प्रकारचे नियम नसल्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये एक वेळेस व्यवहार झाल्यास आपण त्या व्यवहाराला रिव्हर्स करू शकत नाही. ही करन्सी खूप जास्त अस्थिर आहे. क्रिप्टोकरन्सीचा दर हा खूप जास्त प्रमाणात कमी जास्त होतो. क्रिप्टोकरन्सीचा वापर हा गैरकृत्य करण्यासाठी होऊ शकतो. कारण की यावर कोणाचेही नियंत्रण नसते. बिटकॉइन चलनाचा सर्वात मोठा तोटा हा आहे की, जर तुमचा संगणक हॅक झाला असेल तर तो परत केला जाणार नाही, म्हणजेच तो परत मिळणार नाही. एवढेच नाही तर त्याच्या चोरीबद्दल तुम्ही पोलीसात किंवा कुठेही तक्रार नोंदवू शकत (losses of cryptocurrency) नाही.