महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mughal Garden Renamed : राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नाव बदलले.. आता अमृत उद्यान दिले नाव

राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नाव बदल्याण्यात आले असून, त्याला अमृत उद्यान म्हणून नाव देण्यात आले आहे. राष्ट्रपतींनी हे नाव बदलले. उद्यानाला अमृत उद्यान असे सामान्य नाव दिल्याने भारताच्या राष्ट्रपतींना आनंद होत आहे, असे राष्ट्रपतींच्या उपप्रेस सचिव नाविका गुप्ता यांनी सांगितले.

Rashtrapati Bhavans Mughal Garden Renamed as Amrit Udyan President of India has given name
राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नाव बदलले.. आता अमृत उद्यान दिले नाव

By

Published : Jan 28, 2023, 5:53 PM IST

Updated : Jan 28, 2023, 7:28 PM IST

नवी दिल्ली:'आझादी का अमृत महोत्सव' म्हणून स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात असलेल्या मुघल गार्डनचे नाव अमृत उद्यान असे ठेवले आहे. राष्ट्रपतींचे उप-प्रेस सचिव नाविका गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे.

राष्ट्रपती भवन उद्यान उत्सवचे उद्या उद्घाटन: राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित मुघल गार्डन आता 'अमृत उद्यान' म्हणून ओळखले जाईल. हे उद्यान 31 जानेवारीपासून लोकांसाठी खुले होईल, शनिवारी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात राष्ट्रपती भवनाने ही माहिती दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रविवारी राष्ट्रपती भवन - उद्यान उत्सव 2023 चे उद्घाटन करतील, असे त्यात म्हटले आहे. आझादी का अमृत महोत्सव म्हणून स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रपती भवनाच्या उद्यानाला अमृत उद्यान असे सामान्य नाव दिल्याने भारताच्या राष्ट्रपतींना आनंद होत आहे, असे राष्ट्रपतींच्या उपप्रेस सचिव नाविका गुप्ता यांनी सांगितले.

नवीन उद्यानेही केली आहेत विकसित:सरकारने गेल्या वर्षी दिल्लीच्या प्रसिद्ध राजपथाचे नामकरण कर्तव्यपथ असे केले होते. राष्ट्रपती भवन हे विविध प्रकारच्या बागांचे घर आहे. मुळात, त्यात पूर्व लॉन, सेंट्रल लॉन, लाँग गार्डन आणि वर्तुळाकार गार्डन यांचा समावेश होता. माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम आणि राम नाथ कोविंद यांच्या कार्यकाळात हर्बल-I, हर्बल-II, टॅक्टाइल गार्डन, बोन्साई गार्डन आणि आरोग्य वनमही नवी उद्याने विकसित करण्यात आली.

यावर्षी १२ नवे ट्युलिप्स पाहायला मिळणार:या वर्षीच्या उद्यान उत्सवामध्ये इतर अनेक आकर्षणांबरोबरच, पर्यटकांना खास लागवड केलेल्या 12 अनोख्या जातींचे ट्युलिप्स पाहायला मिळतील. यावेळी उद्यान सुमारे दोन महिने खुले राहणार आहेत. उद्याने 31 जानेवारी 2023 रोजी सर्वसामान्यांसाठी उघडली जातील आणि 26 मार्च 2023 पर्यंत खुली राहतील. 28 ते 31 मार्च या कालावधीत उद्याने विशेष श्रेणींसाठी खुली राहतील. त्यात 28 मार्च रोजी शेतकऱ्यांसाठी, 29 मार्च रोजी दिव्यांगांसाठी, 30 मार्च रोजी संरक्षण दल, निमलष्करी दल आणि पोलीस दलातील जवानांसाठी आणि आदिवासी महिलांसह महिलांसाठी, 31 मार्च रोजी बचत गटातील लोकांसाठी उद्यानं खुली असणार आहेत.

ऑनलाईन बुकिंग करण्याचे आवाहन: राष्ट्रपती भवनच्या वेबसाईटवर ऑनलाइन बुकिंगद्वारे लोक त्यांचे स्लॉट अगोदरच बुक करू शकतात. गर्दी टाळण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी अगोदरच स्लॉट ऑनलाइन बुक करण्याचा सल्ला दिला देण्यात आला आहे. सर्व अभ्यागतांसाठी प्रवेश आणि निर्गमन राष्ट्रपती इस्टेटच्या गेट क्रमांक 35 मधून ठेवण्यात आला आहे.भेट देण्यासाठी येताना लोकांनी कोणतीही ब्रीफकेस, कॅमेरे, रेडिओ/ट्रान्झिस्टर, बॉक्स, छत्र्या, खाण्यायोग्य वस्तू इत्यादी बागांमध्ये आणू नयेत, असेही राष्टपती भवनने निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा: Republic Day भारतीय फिल्ड गनद्वारे दिली सलामी इजिप्तचे सैन्य परेडमध्ये सहभागी

Last Updated : Jan 28, 2023, 7:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details