हैदराबाद :जगातील सर्वात मोठी रोमोजी फिल्म सिटीची ओळख आहे. या फिल्म सिटीची नोंद गिनीज वर्ल्ड मध्ये देखील करण्यात आली आहे. इथे मनोरंजनासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. असेच आयोजन महिला दिनाचे औचित्य साधुन करण्यात येणार आहे. 8 मार्च रोजी जगभरात साजरा होणार्या आंतरराष्ट्रीय महिला दिन 2023 च्या आधी, रामोजी फिल्म सिटीने महिलांसाठी एक अनोखा खास कार्यक्रम सुरू केला आहे.
फिल्म सिटीच्या प्रवक्त्याने ईटीव्ही भारतला सांगितले की, रामोजी फिल्म सिटी 1 मार्च ते 31 मार्च या कालावधीत 'आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त' महिला स्पेशल मंथचे आयोजन करत आहे. यावेळी महिलांसाठी विशेष ऑफरचा आनंद घेता येणार आहे. एक महिलेच्या टिकिटावर दुसऱ्या महिलेला किंवा मुलीला विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवक्त्याने सांगितले की, फक्त एकाच प्रवेश तिकिटासाठी पैसे द्यावे लागतील आणि एक पूर्णपणे विनामूल्य टिकिट असणार आहे.
पुढे बोलतांना त्यांनी महिती दिली की, 'रामोजी फिल्मसिटी विविध भूमिका साकारणाऱ्या तसचे महिसांची स्वप्ने, आकांक्षा, आवडींचा विचार करुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.' रामोजी फिल्म सिटी येथील अनुभवाचा एक भाग म्हणून, महिलांना थीमॅटिक आकर्षणे, भव्य चित्रपट सेट्स, भव्य थीम गार्डन्स आणि चमचमीत कारंजे यांचा आनंद घेता येणार आहे. तसेच एक मंत्रमुग्ध करणारा स्टुडिओ टूर देखील महिला करु शकतात. बर्ड पार्क, बटरफ्लाय पार्क, बोन्साई गार्डनलाही भेट देता येइल.