महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अबू धाबीत साकारणार भव्य राम मंदिर, 888 कोटींचा येणार खर्च - अबू धाबी हिंदू मंदिर

अबूधाबीत राम मंदिराचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी 888 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे बांधकाम 2023 पर्यंत पूर्ण होईल, असा मंदिराच्या प्रशासनाला विश्वास आहे.

अबुधाबी हिंदू मंदिर
अबुधाबी हिंदू मंदिर

By

Published : Sep 27, 2021, 4:38 PM IST

Updated : Sep 27, 2021, 5:02 PM IST

लखनौ -राम मंदिर म्हटले की अयोध्येतील चित्र तुमच्या डोळ्यासमोर येत असेल. पण, अयोध्येतील राम मंदिराप्रमाणे संयुक्त अरब अमिरातमध्ये राम मंदिर बांधले जात आहे. शेकडो अभियंत्यांची टीम या मंदिराचे बांधकाम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा त्यांनी या मंदिराची पायाभरणी केली होती.

संयुक्त अरब अमिराती देशातील अबूधाबी हे भारतीयांसाठी श्रद्धास्थान ठरत आहे. अबू धाबी मंदिरात हिंदू मंदिर बांधले जात आहे. हे बांधकाम वेगाने सुरू आहे. मंदिराचे बांधकाम हे 16.7 एकर मंदिरात होणार आहे. मंदिर परिसरासाठी सुमारे 900 कोटी रुपये खर्च होणार आहेत. 2023 पर्यंत हे मंदिर पूर्ण होईल, असा अंदाज आहे. या मंदिरात 200 हून अधिक कलाकृती ठेवल्या जाणार आहेत.

नकाशा दाखविताना महंत

हेही वाचा-मराठमोळे आयपीएस महेश भागवतांचे अनोखे विद्यादान; मार्गदर्शन केलेले 131 विद्यार्थी यूपीएससीत उत्तीर्ण


गुलाबी दगड बसविण्याचे काम सुरू होणार

हिंदू मंदिर अबू धाबी योजनेतील कोअर टीमच्या सदस्यांच्या माहितीनुसार संयुक्त अरब अमिरातमधील पहिले हिंदू मंदिर हे जास्ती जास्त 1 हजार वर्षे टिकू शकणार आहे. मंदिराच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार मंदिराच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. भारतामधून कारागीर पोहोचल्यानंतर गुलाबी दगड बसविण्याचे काम सुरू होणार आहे.

हेही वाचा-21 कोटींची बोली लागलेल्या ‘सुलतानचे’ हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मंदिर बांधण्यासाठी सुमारे 888 कोटी रुपये खर्च

धार्मिक नेता आणि बीएपीएस हिंदू मंदिराचे प्रवक्ता पूज्य ब्रम्हविहारी स्वामी म्हणाले, की अबू मुरीखाहमधील मंदिराच्या जमिनीवर बलुआ दगड मोठ्या प्रमाणात बसविण्यात येणार आहे. मंदिराच्या विकासाचे देखरेख करणारे स्वामी म्हणाले, की हे मंदिर खूप मजबूत आहे. मंदिरात बसविण्यासाठी शुभ्र संगरमरवरी दगडांनी खास डिझाईन केली जाणार आहे. त्यासाठी भारतामधून कारागीरांना बोलाविण्यात येणार आहे. मंदिर बांधण्यासाठी सुमारे 888 कोटी रुपये खर्च येणार आहे.

हेही वाचा-केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला भारत बंद, गाझीयाबाद मार्ग बंद करणार

30 अभियंत्यांनी तयार केले थ्रीडी मॉडेल

मंदिराची पायाभरणी मजबूत करण्यासाठी अधिकांश फ्लाय अॅशचा (राख) वापर करण्यात आला आहे. त्यामधील 55 टक्के सिमेंट आणि काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. मंदिराचे बांधकाम करण्यासाठी 10 देशांमधील 30 अभियंत्यांनी 5 हजार तास काम करून थ्रीडी मॉडेल तयार केले आहे. मंदिराचे डिझाईन पुर्णपणे डिजीटल पद्धतीने तयार करण्यात आले आहे.

अयोध्येमधील राममंदिर2023 ला होणार खुले

अयोध्यामधील राममंदिर डिसेंबर 2023 पर्यंत भक्तांसाठी खुले होणार आहे. त्यामुळे भारतासहित जगभरातील भाविक हे रामललाचे दर्शन करू शकणार आहेत.

Last Updated : Sep 27, 2021, 5:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details