नवी दिल्ली -गेल्या दोन महिन्यापासून केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या दिल्लीतील शेतकरी आंदोलनातून शेतकरी नेते राकेश टिकैत यांच नाव समोर आले आहे. सध्या हे नाव देशपातळीवर चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र परिचयाचे झालेले राकेश टिकैत यांच्या संपत्तीविषयी अनेक दावे करण्यात येत आहेत. यावर राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली. माझी-तुझी नाही. तर सर्व शेतकऱ्यांची संपत्ती एक आहे. देशात जो कोणी शेतकरी आंदोलनाला मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरमध्ये इंधन मोफत टाकत आहे. तो पेट्रोल पंप आपला आहे, असेही ते म्हणाले.
शेतकरी आंदोलनामध्ये सहभाग घेतलेल्या इतक्या सर्व शेतकऱ्यांची संपत्ती मी कशी मोजू. जे सर्व आहे. ते शेतकऱ्यांचे आहे, असे ते म्हणाले. तसेच 18 फेब्रुवरीला रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
संपत्ती वादावर राकेश टिकैत यांची प्रतिक्रिया टिकैत यांच्या संपत्तीविषयी अनेक दावे -
राकेश टिकैत यांच्या संपत्तीविषयी अनेक दावे करण्यात येत आहे. राकेश टिकैत यांची उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि महाराष्ट्र या राज्यात मालमत्ता आहे. मुजफ्फरनगर, ललितपूर, झांशी, लखीमपुर खेरी, बिजनौर, बदायूं, दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, देहरादून, रुड़की, हरिद्वार आणि मुंबईसह इतर देशातील शहरांमध्ये राकेश टिकैत यांची संपत्ती आहे. राकेश टिकैत यांच्याकडे जवळपास 80 कोटींची मालमत्ता असल्याचा दावा करण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये राहते राकेश टिकैत यांची मुलगी -
राकेश टिकैतच्या दोन मुली विवाहित आहेत. राकेश टिकैटची छोटी मुलगी ज्योती टिकैत ऑस्ट्रेलियात राहते. 8 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात कृषी विधेयकाच्या निषेधार्थ बसलेल्या निदर्शकांना पाठिंबा देण्यासाठी एक मोर्चा काढण्यात आला होता. तो मोर्चा टिकैत यांच्या मुलीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता.
कोण आहेत राकेश टिकैत ?
उत्तर प्रदेशातल्या मुजफ्फरनगर येथील जनपदच्या सिसौली गावात 4 जून 1969 साली राकेश यांचा जन्म झाला होता. राकेश यांनी मेरठ विद्यापीठातून एम.ए चे शिक्षण घेतले आहे. प्रसिद्ध शेतकरी नेते महैंद्र सिंग टिकैत यांचे राकेश हे सुपत्र आहेत. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी राकेश टिकैत यांनी अनेकदा आंदोलनं केली आहेत. यासाठी त्यांना तब्बल 44 वेळा तुरुंगवासही भोगावा लागलेला आहे. संसद भवनाबाहेर ऊस जाळून आंदोलन केल्यामुळे राकेश यांना तिहार तुरुगांत शिक्षासुद्धा भोगावी लागलेली आहे. राकेश टिकैत हे एकेकाळी दिल्ली पोलिसांत कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करत होते. 1992 साली राकेश दिल्ली पोलिसांत सब-इन्स्पेक्टर म्हणून रूजू झाले होते. यादरम्यान एक घटना घडली ज्यामुळे राकेश यांनी ती नोकरी सोडून दिली. राकेश यांच्यावर वडील महेंद्र सिंग टिकैत यांचा खूप प्रभाव होता. त्यामुळेच 1993-94 मध्ये दिल्लीतील लाल किल्ल्यावर वडील महेंद्र सिंह टिकैत यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं