नवी दिल्ली:अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजासाठी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी काँग्रेस खासदार रजनी पाटील यांना निलंबित केले आहे. रजनी अशोकराव पाटील या निरुपद्रवी कार्यात अडकलेल्या आहेत आणि आम्हाला सोशल मीडियावर जे काही दिसले त्याकडे आपले लक्ष वेधले पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाची विशेषाधिकार समितीमार्फत चौकशी केली जाईल आणि जोपर्यंत विशेषाधिकार समितीच्या शिफारशीचा निर्णय येत नाही तोपर्यंत डॉ. रजनी अशोकराव पाटील यांना चालू अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे, असे राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर म्हणाले.
रजनी पाटील काय म्हणाल्या: मी स्वातंत्र्य सेनानींच्या घरातून येते. त्यामुळे जर माझ्याकडून काही चुकीचं झालं असेल तर त्याचा इतका बाऊ करण्याची गरज नव्हती. हा विषय काढून काढून भाजपच्या लोकांनी मला अपमानित करण्याचं काम केलं आहे. असं रजनी पाटील यावेळी म्हणाल्या. त्यावर राज्यसभेत गदारोळ सुरु झाला. भाजपच्या खासदारांनी पाटील यांच्या या वक्तव्याला विरोध करत गदारोळ घातला. काँग्रेसकडूनही त्याला प्रत्त्युत्तर देण्यात आले.
काय म्हणाले राज्यसभेचे सभापती:राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर म्हणाले की, आज ट्विटरवर, या सभागृहाच्या कार्यवाहीशी संबंधित व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. मी त्याचा गांभीर्याने विचार केला आणि आवश्यक ते सर्व केले. तत्त्वानुसार आणि संसदेचे पावित्र्य राखण्यासाठी कोणत्याही बाहेरील एजन्सीचा सभागृहाच्या कामकाजात सहभाग मागता येणार नाही, त्यामुळे रजनी पाटील यांना निलंबित करण्यात येत आहे.