महाराष्ट्र

maharashtra

लॉईड ऑस्टिन-राजनाथ सिंह यांच्यात बैठक; दहशतवाद, चीन आणि शांततेवर चर्चा

By

Published : Mar 20, 2021, 3:40 PM IST

अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी आज भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. द्विपक्षीय संबंधाचा विस्तार करण्यासह हिंद-प्रशात सागरामधील बदलती परिस्थिती, चीनचे विस्तारवादी धोरण आणि दहशतवाद या मुद्यांवर दोघांनी चर्चा केली.

लॉईड ऑस्टिन-राजनाथ सिंह
लॉईड ऑस्टिन-राजनाथ सिंह

नवी दिल्ली -अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. द्विपक्षीय संबंधाचा विस्तार करण्यासह हिंद-प्रशात सागरामधील बदलती परिस्थिती, चीनचे विस्तारवादी धोरण आणि दहशतवाद या मुद्यांवर दोघांनी चर्चा केली. या बैठकीत सीडीएस जनरल बिपिन रावत आणि तीन्ही दलाचे प्रमुख उपस्थित होते.

भारत आणि अमेरिकेतले संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यासाठी ते सहकार्य वाढवण्याबाबत त्यांनी चर्चा केली. दोन देशांमधल्या लष्करामध्ये थेट सहकार्य वाढवण्यासाठीवरही त्यांनी भर दिल्याची माहिती आहे. तसेच भारत-प्रशांत प्रदेश मुक्त आणि सर्वसमावेशक ठेवण्यातील सामायिक हेतूंवर यावेळी प्रामुख्याने चर्चा झाली. 30 प्राणघातक ड्रोन आणि 144 लढाऊ विमाने खरेदी यासारख्या करारावरही चर्चा झाली.

अमेरिकेचे कृष्णवर्णीय संरक्षण मंत्री -

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रिपदी लॉयड ऑस्टिन यांची नियुक्‍ती करण्यात आल्यानंतर राजनाथ सिंह यांनी त्यांच्यासोबत दुरध्वनीद्वारे संपर्क साधला होता. दोघांची समोरासमोर झालेली ही पहिलीच बैठक आहे. अमेरिकेला पहिल्यांदाच कृष्णवर्णीय संरक्षण मंत्री मिळाले आहेत.

रविवारी दौरा संपणार -

भारतातामध्ये पोहचल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. पराराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचीही ते भेट घेणार असल्याची शक्यता आहे. तसेच रविवारी अमेरिकेत परतण्यापूर्वी पुन्हा एकादा मोदींना भेटू शकतात. मात्र, अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही.

हेही वाचा -सरकारने वाढवली बेरोजगारी, महागाई आणि मित्रांची 'कमाई', राहुल गांधींचा केंद्रावर हल्ला

ABOUT THE AUTHOR

...view details