राजगड-जीरापूरच्या एका गावात एका विशिष्ठ जातीच्या व्यक्तीच्या वरातीवर दगडफेक करणे उपद्रव्यांना महागात पडले आहे. प्रशासनाने बुलडोझर चालवून आरोपींची घरे पाडली. मंगळवारी रात्री उशिरा त्या वराच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी 21 आरोपींची ओळख पटवली होती. यानंतर गुरुवारी (दि. 19 मे) ओळख पटलेल्या घरांवर बुलडोझर चालवण्याची कारवाई करण्यात आली. महसूल कर्मचारी, महापालिका कर्मचारी यांच्या उपस्थितीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात पोकलेन मशीनसह जेसीबी मशिनद्वारे 8 घरे जमीनदोस्त करण्यात ( Accused Houses Demolished ) आली.
काय आहे प्रकरण- जिरापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रभात गौड यांनी सांगितले की, राजगढ जिल्हा मुख्यालयापासून 38 किमी अंतरावर असलेल्या जिरापूर शहरात मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एकाची वरात एका मशिदीबाहेरून जात होती. तेव्हा काही समाजातील लोकांनी डीजे वाजवला. यावर आक्षेप घेतल्याने त्यांनी काही वेळ डीजे बंद केला. त्यानंतर मंदिराजवळ वरात पोहोचताच त्यांनी पुन्हा डीजे वाजवण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आधी याचा विरोध करण्यात आला त्यानंतर दगडफेक करण्यात आली.