मुंबई:रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकांत 8 गडी गमावून 144 धावा केल्या. ( Rajasthan Royals beat RCB ) प्रत्युत्तरात बंगळुरूचा संघ केवळ 115 धावा करू शकला. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्सवर मात करत स्पर्धेतील हा सहावा विजय नोंदवला.
बंगळुरूने 9 षटकांनंतर 3 बाद 55 धावा - राजस्थानने दिलेल्या 145 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना आरसीबीने 37 धावांत तीन गडी गमावून खराब सुरुवात केली. कुलदीप सेनने दोन चेंडूत दोन विकेट घेत बंगळुरूला मोठा धक्का दिला आहे. कुलदीपने कर्णधार फाफ डू प्लेसिसला बाद केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेल खाते न उघडता बाद झाला. डू प्लेसिसने २१ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 23 धावा केल्या. बंगळुरूने 9 षटकांनंतर 3 बाद 55 धावा केल्या.
20 षटकांत 8 गडी गमावून 144 धावा - आयपीएल 2022 च्या 39 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 29 धावांनी पराभव केला. यासह राजस्थानने बेंगळुरूकडून मागील सामन्याचा बदलाही घेतला. याच मोसमात उभय संघांमधील अखेरच्या सामन्यात बंगळुरूने राजस्थानचा चार विकेट राखून पराभव केला होता. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकांत 8 गडी गमावून 144 धावा केल्या.