गांधीनगर - गुजरात युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वनाथ सिंह वाघेला यांनी काल रविवार (दि. 5 सप्टेंबर)रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, आजच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज सोमवार (दि. 5 सप्टेंबर)रोजी गुजरात दौऱ्याच्या एक दिवस अगोदर वाघेला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (Gujarat Youth Congress President Vishwanath Singh Vaghela) वाघेला यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष जगदीश ठाकोर यांना पत्र लिहित आपला राजीनामा दिला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांचा 7 सप्टेंबर रोजी पक्षाच्या 'भारत जोडो यात्रा' सुरू करण्याच्या दोन दिवस आधी गांधींचा हो गुजरात दौरा आहे.
हा पक्षाला मोठा धक्का - 2 सप्टेंबर रोजी पक्षाचे नेते राजिंदर प्रसाद यांनी पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ते नौशेरा राजौरी येथील दिवंगत मास्टर बेली राम शर्मा यांचे चिरंजीव आहेत. (Bharat Jodo Yatra) प्रसाद यांनी 'कोटारी' यंत्रणा हे पक्षावर येणाऱ्या अडचणींचे कारण असल्याचे सांगितले. अलीकडच्या काही महिन्यांत राजिंदर प्रसाद आणि अनेक उच्चपदस्थ नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद काँग्रेसमधून बाहेर पडणे हा पक्षाला मोठा धक्का आहे.