नवी दिल्ली Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नाहीत. यावर आता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "22 जानेवारीचा कार्यक्रम हा राजकीय आहे", असं ते म्हणाले.
धर्माचा फायदा घ्यायचा नाही : "22 जानेवारीचा कार्यक्रम हा राजकीय आहे. आम्ही सर्व धर्मांसोबत आहोत. मला धर्माचा फायदा घ्यायचा नाही. मला त्यात रस नाही. मला माझ्या शर्टवर माझा धर्म घालण्याची गरज नाही. मात्र, ज्याला तिथे जायचे असेल तो जाऊ शकतो. पण त्या दिवशी आम्ही तिथे जाणार नाही. आमच्या पक्षातील कोणीही तिथे जाऊ शकतो. मात्र आम्ही राजकीय कार्यक्रमांना जाणार नाही", अशी भूमिका राहुल गांधींनी मांडली.
नरेंद्र मोदींचा राजकीय कार्यक्रम : "संघ आणि भाजपानं 22 जानेवारीच्या कार्यक्रमाला नरेंद्र मोदींचा राजकीय कार्यक्रम बनवलाय. हा संघ आणि भाजपाचा कार्यक्रम झाला आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षांनी कार्यक्रमाला जाणार नसल्याचं सांगितलं. आम्ही सर्व धर्मांना मानणारे आणि त्यांचा आदर करणार्यांपैकी आहोत. हिंदू धर्मातील बड्या नेत्यांनीही आपलं मत मांडलंय. त्यांनीही याला राजकीय कार्यक्रम म्हटलं", असं राहुल गांधी म्हणाले.