वॉशिंग्टन :काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात सूरत न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यावर अमेरिकेत भाष्य करताना राहुल गांधी यांनी चांगलाच हल्लाबोल केला. मानहानी खटल्यात इतकी मोठी शिक्षा झालेला मी पहिलाच नेता असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. वॉशिंग्टनमधील नॅशनल प्रेस क्लबमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना राहुल गांधी यांनी हा हल्लाबोल केला. लोकसभेतील अदानी-हिंडेनबर्ग वादावरील भाषणानंतर माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचा दावाही राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे.
अदानी हिंडेनबर्गवर बोलल्यानंतरच माझ्यावर कारवाई :अदानी हिंडेनबर्ग विषयावर लोकसभेत आवाज उठवल्यानंतरच माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचा दावा काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी केला आहे. 1947 पासूनच्या इतिहासात मानहानीच्या खटल्यात सर्वोच्च शिक्षा झालेला मी भारतातील पहिला माणूस आहे. पहिल्या गुन्ह्यात कोणालाही जास्तीत जास्त शिक्षा झालेली नाही. त्यावरून तुमचे काय चालले आहे हे स्पष्ट केले पाहिजे, असही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. संसदेत अदानीबद्दलच्या माझ्या भाषणानंतर माझी अपात्रता झाल्याचे प्रकरण खुपच मनोरंजक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.