स्टॅनफोर्ड (कॅलिफोर्निया) : भारतीय राजकारणात विरोधकांचा लढा सुरूच असतो. भारतीय राजकारणी एकमेकांविरोधात लढत आहेत. सध्या भारताच्या राजकारणात जे सुरू आहे, ते कल्पनेपलिकडचे आहे. माझ्यासोबत कधी अपात्रतेची कारवाई होईल, असे कधीच वाटले नव्हते, मात्र माझ्या अपात्रतेच्या कारवाईचे षडयंत्र सहा महिन्यापूर्वीच सुरू असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी बुधवारी रात्री स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी बोलत होते.
अपात्र होईल असे कधीच वाटले :राजकारणात प्रवेश करताना लोकसभेतून अपात्र होईल असे कधीही वाटले नव्हते, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. खासदार म्हणून जनतेची सेवा करण्याची मोठी संधी मिळाली. मात्र सूरत कोर्टाने गुन्हेगारी मानहानीप्रकरणी दोषी ठरवले. त्यामुळे खासदारकी गेल्याने राहुल गांधी यांनाी अमेरिकेत यावर भाष्य केले. 2000 मध्ये सक्रिय राजकारणात आल्यानंतर आपण या परिस्थितीतून जाईन असे वाटले नव्हते, असेही स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले.
भारताच्या राजकारणात कल्पनेपलिकडच्या घटना :भारताच्या राजकारणात सध्या जे काही चालले आहे, ते कल्पनेपलीकडचे आहे. माझ्यावर अपात्रतेची कारवाई होईल, अशी याची कल्पनाही केली नव्हती. कदाचित असेच राजकारण चालते, असेही राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले.
सहा महिन्यांपूर्वी षडयंत्र :राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने त्यांनी आपला पासपोर्टही जमा करावा लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. आपली खासदारकी हिसकावण्याची योजना सहा महिन्यांपूर्वी सुरू झाली होती. आम्ही भांडत होतो, आताही संपूर्ण विरोधक भारतात लढत आहेत. भाजपकडे मोठी आर्थिक क्षमता असून संस्थांवर त्यांचे नियंत्रण असल्याचेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. आम्ही आमच्या देशात लोकशाहीची लढाई लढण्यासाठी धडपडत आहोत. मात्र, सहा महिन्यांपूर्वी आम्ही भारत जोडो यात्रा काढण्याचे ठरवले, त्यानंतर सगळे राजकारण सुरू झाल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्न :राहुल गांधी यांनी अमेरिकन विद्यापीठातील भारतीय वंशाचे विद्यार्थी आणि शिक्षणतज्ञांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मी अगदी स्पष्ट आहे, हा आमचा लढा आहे. त्यासाठी लढावे लागेल. मला येथे उपस्थित असलेल्या भारतातील तरुण विद्यार्थ्यांशी कनेक्ट व्हायचे आहे. मला त्यांच्याशी बोलायचे आहे, हे करणे हा माझा अधिकार आहे. मी कोणाचाही पाठिंबा मागत नसल्याचे त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले. स्टॅनफोर्डच्या विद्यापीठात पंतप्रधान येथे का येत नाहीत हे मला समजत नसल्याचेही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रश्न केला. पंतप्रधानांनी येथे येऊन विद्यार्थी आणि अभ्यासकांशी बोलावे, असेही राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा -
- Rahul Gandhi On Muslim Attack : 80 च्या दशकात जे दलितांचे झाले तेच आज मुस्लिमांचे होत आहे - राहुल गांधी
- Rahul Gandhi California Visit: भारतीय राजकारणातील प्रत्येक गोष्टीवर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियंत्रण-राहुल गांधी
- Rahul Gandhi On US Visit : राहुल गांधी पोहोचले सॅन फ्रान्सिस्कोला, दोन तास विमानतळावर ताटकळल्यानंतर पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल