पाटणा : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज बिहारमधील पाटणा येथे पोहोचले आहेत. मोदींच्या आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत भाजप नेते आणि खासदार सुशील कुमार मोदी यांनी 2019 मध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला होता. पटनाच्या न्यायालयाने त्यांना कलम 317 अंतर्गत न्यायालयात हजर राहण्यासाठी आणि त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स पाठविले होते. मोदी आडनावाचा अपमान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधींना न्यायालयाने २५ एप्रिलला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
मोदी समाजाला चोर म्हणत अपमान :सुशील कुमार मोदी यांनी 2019 मध्ये राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधींनी मोदी समाजाला चोर म्हणत अपमान केल्याचा त्यांनी खटल्यात आरोप केला होता. त्यानंतर राहुल गांधी यांना जामीन मिळाला होता. या प्रकरणात सुशील कुमार मोदी यांच्यासह पाच जणांची महत्त्वपूर्ण साक्ष पूर्ण झाली आहे. या प्रकरणाचे याचिकाकर्ते खासदार सुशील मोदी यांचे म्हणणे आहे की, राहुल गांधी यांनी देशातील लाखो मोदी आडनाव असलेल्या लोकांचा अपमान केला आहे. मागास समाजातील लोकांचे आडनाव मोदी आहे. त्यामुळे दुखावल्याचे त्यांनी म्हटले आहे.