महाराष्ट्र

maharashtra

Ganja Seized Telangana : पुन्हा मोठी कारवाई! तेलंगाणामार्गे मुंबई जाणारा गांजा रचकोंडा पोलिसांनी पकडला

By

Published : Mar 23, 2022, 10:40 PM IST

Updated : Mar 24, 2022, 10:10 PM IST

रचकोंडा पोलिसांनी 410 किलो गांजा पकडला (Rachakonda police seized 410 kgs of ganja) आहे. हा गांजा कारमधून मुंबईला नेत असताना ही कारवाई करण्यात आली आहे. यात तीन जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती रचकोंडा पोलीस आयुक्त महेश भागवत (Rachakonda CP Mahesh Bhagwat) यांनी दिली आहे.

rachakonda police
रचकोंरचकोंडा पोलिसांनी गांजा पकडलाडा पोलिसांनी पकडला गांजा

हैदराबाद - एका मोठ्या कारवाईत रचकोंडा पोलिसांनी 410 किलो गांजा पकडला (Rachakonda police seized 410 kgs of ganja) आहे. हा गांजा कारमधून मुंबईला नेत असताना ही कारवाई करण्यात आली आहे. यात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तर अन्य तीन जण फरार असून, त्यातील एख आरोपी मुंबईतला आहे, अशी माहिती रचकोंडा पोलीस आयुक्त महेश भागवत (Rachakonda CP Mahesh Bhagwat) यांनी दिली आहे. मागील काही दिवसांमध्ये आंध्र प्रदेश, तेलंगाणामधून महाराष्ट्रात गांजाचा पुरवठा होत असल्याच्या अऩेक घटना घडत आहेत.

रचकोंडा पोलीस आयुक्त महेश भागवत

एलबी नगर एसओटीची कारवाई : पोलिसांनी अटक केलेल्यांकडून टोयोटा इनोव्हा आणि महिंद्रा व्हेरिटो कार तसेच तीन मोबाईल फोनही जप्त केले आहेत. गुडियानाराम व्यंकट नारायण (२८), दब्बडी रजनीकांत (२६) आणि यचाराम नागराजू (२९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अन्य तीन आरोपी फरार असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. हा गांजा मुंबईला जात होता. रचकोंडा पोलिसांच्या एलबी नगर विभागाच्या एसओटी टीमने ही कारवाई केली आहे.

रचकोंडा पोलिसांनी गांजा पकडला

मुंबईला नेला जात होता गांजा : रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी सांगितले की, नारायण, नागराजू आणि रजनीकांत यांनी आंध्र प्रदेशातील भद्राचलमजवळील एका गावातून हा गांजा घेतला. त्यानंतर ही टोळी हा गांजा दोन कारमधून मुंबईत घेऊन जात होती. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एलबी नगर एसओटी पथकाने केसारा येथे त्यांना पकडले, त्यावेळी त्यांच्याकडून 410 किलो गांजा पकडला आहे.

Last Updated : Mar 24, 2022, 10:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details