मुंबई - पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सवर आठ गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. पंजाबने गुजरातने दिलेल्या 144 धावांचे लक्ष्य दोन गडी गमावून 24 चेंडू राखून पूर्ण केले. पंजाबचा हा पाचवा विजय असून ते आता गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत. दुसरीकडे, गुजरातला मोसमातील दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ( Punjab Kings beat Gujarat Titans by eight wickets ) पंजाबकडून शिखर धवनने 53 चेंडूत 62 धावा केल्या आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 10 चेंडूत 30 धावा केल्या. याशिवाय भानुका राजपक्षेने 28 चेंडूत 40 धावा केल्या.
या विजयानंतर पंजाबने थेट 8व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. (Punjab Kings defeated Gujarat Titans) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. पराभवानंतरही गुजरात अव्वल स्थानावर आहे. गुणतालिकेत गुजरातनंतर लखनौ सुपर जायंट्स दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स तिसऱ्या तर सनरायझर्स हैदराबाद चौथ्या स्थानावर आहे. हैदराबाद, पंजाब आणि आरसीबी या सर्वांचे 10-10 गुण आहेत. उत्तम धावगतीच्या जोरावर पंजाबने आरसीबीचा पराभव केला