महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज सिद्धू मुसेवालाच्या कुटुंबाची भेट घेतली - सिद्धू मुसेवाला यांची हत्या

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज मानसा येथील सिद्धू मुसेवाला यांच्या घरी पोहोचून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तत्पूर्वी, आप आमदारही मुसेवाला यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी शोक व्यक्त केला.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज सिद्धू मुसेवालाच्या कुटुंबाची भेट घेतली
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज सिद्धू मुसेवालाच्या कुटुंबाची भेट घेतली

By

Published : Jun 3, 2022, 12:23 PM IST

मानसा - पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज मानसा येथील सिद्धू मुसेवाला यांच्या घरी पोहोचून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. गुन्हेगारांना सोडले जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी पीडित कुटुंबाला दिले. तत्पूर्वी, आप आमदारही मुसेवाला यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी शोक व्यक्त केला. यावेळी आमदारांना जनतेच्या विरोधालाही सामोरे जावे लागले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गावाचे छावणीत रुपांतर करण्यात आले.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज सिद्धू मुसेवालाच्या कुटुंबाची भेट घेतली


विशेष म्हणजे पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांना भेटून शोक व्यक्त करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या घरी शोक व्यक्त करण्यासाठी सर्वसामान्यांसोबतच राजकारणीही सातत्याने पोहोचत आहेत. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शोक व्यक्त केला आहे. मान यांच्या भेटीपूर्वी पोहोचलेले आप आमदार गुरप्रीत सिंग यांना विरोधाचा सामना करावा लागला. त्यांच्यासमोर पंजाब सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.


सरदुलगडचे आमदार गुरप्रीत सिंह शुक्रवारी सिद्धू मुसेवाला यांच्या घरी पोहोचले होते. त्यांचे आगमन होताच लोकांनी निषेध केला आणि पंजाब सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी आमदाराने हात जोडून लोकांची माफीही मागितली. मात्र, लोकांनी त्यांना घरात जाऊ दिले नाही. मुख्यमंत्री येण्यापूर्वीच संपूर्ण गावाचे पोलीस छावणीत रुपांतर झाल्याचा आरोप लोकांनी केला. लोकांना आत प्रवेश दिला जात नाही. आम्ही कोणत्याही नेत्याला येथे येऊ देणार नाही, असे ते म्हणाले आहेत.


हेही वाचा -Priyanka Gandhi: प्रियंका गांधी यांना कोरोनाची लागण; ट्विट करून दिली माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details