लखनऊ ISIS Target On Hindu Leaders : इसीस या दहशतवादी संघटनेनं हिंदू नेत्यांच्या हत्येच्या कटाची योजना आखल्याचं दहशतवाद्यांच्या कबुलीतून उघड झालं आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या डासना इथल्या शिवशक्ती धाम मंदिराचे महंत नरसिंहानंद सरस्वती यांची हत्या करण्याचा कट इसीसच्या दहशतवाद्यांनी रचला होता. याबाबतची कबुली अलिगढ इथून पकडलेल्या माझ बिन तारिक आणि अब्दुल्ला अर्सलान या दहशतवाद्यांनी दिली आहे. पुणे इसीस प्रकरणात या दहशतवाद्यांना पकडण्यात आलं होतं.
महंत नरसिंहानंद सरस्वती यांच्या हत्येचा कट : महंत नरसिंहानंद सरस्वती हे डासना इथल्या शिवशक्ती धाम मंदिराचे महंत आहेत. त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे त्यांच्या हत्येचा कट इसीसच्या दहशतवाद्यांनी रचल्याचं उघड झालं आहे. उत्तरप्रदेश दहशतवाद विरोधी पथकानं पकडलेल्या दहशतवादी माझ बिन तारिक आणि अब्दुल्ला अर्सलान यांनी मंगळवारी कोठडीत ही कबुली दिल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली.
दहशतवाद्यांकडं आढळली इलेक्ट्रॉनिक उपकरणं : उत्तरप्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकानं मंगळवारी इसीसच्या माझ बिन तारिक आणि अब्दुल्ला अर्सलान या दहशतवाद्यांना रिमांडवर उत्तरप्रदेशात नेलं. यावेळी या दहशतवाद्यांकडं काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं मिळाली. या उपकरणांची फॉरेंसिक तपासणी करण्यात आली. यावेळी दोघांच्या चौकशीत त्यांनी डासना इथल्या शिवशक्ती धाम मंदिराचे महंत नरसिंहानंद यांच्या हत्येचा कट इसिसनं रचल्याचं उघड झालं आहे.
पुणे इसीस मॉड्युलला नरसिंहनंदांना मारण्याचे आदेश : डासना इथल्या शिवशक्ती धामचे महंत नरसिंहानंद सरस्वती यांनी मुस्लीम समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा इसीसचा दावा होता. त्यामुळे इसीसचे दहशतवादी प्रचंड संतापले होते. त्यांनी अब्दुल्ला अर्सलान आणि माझ बिन तारिक यांना नरसिंहानंद सरस्वती यांच्यासह अनेक हिंदू नेत्यांच्या हत्या करण्याबाबत या दोघांना माहिती दिली होती. पुणे इसीस मॉड्यूलचे सदस्य हा कट करणार असल्याचंही त्यांना सांगण्यात आलं होतं. त्यातील महंत नरसिंहानंद सरस्वती यांची हत्या करण्याचे आदेश माझ बिन तारिकला देण्यात आल्याची माहिती त्यानं एटीएसला दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. महंत नरसिंहानंद सरस्वती यांच्या हत्येनंतर आणखी हिंदू नेत्यांच्या हत्येबाबत सांगण्यात येईल, असंही त्याला सांगण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
महंत नरसिंहानंद सरस्वती यांची केली रेकी :पुणे इसीस मॉड्युलनं अनेकवेळा महंत नरसिंहानंद सरस्वती यांची रेकी केल्याची माहिती माझ बिन तारिकनं एटीएसला दिली. मात्र त्यांना मारण्याची ही योग्य वेळ नसल्याचं इसीसच्या दहशतवाद्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे ही मिशन पूर्ण होत नव्हती. महंत नरसिंहानंद सरस्वती यांनी एका विशिष्ट धर्माविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याशिवाय त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही वादग्रस्त टीका केली होती. महंत नरसिंहानंद सरस्वती यांच्या या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महंत नरसिंहानंद सरस्वती आणि वसीम रिझवी यांनी हरिद्वार इथं झालेल्या धर्म संसदेत प्रक्षोभक भाषणं केली होती.
हेही वाचा :
- Pune Police Arrested Terrorist : पोलीस पकडायला गेले बांगलादेशी नागरिक, निघाला बॉम्बस्फोटातील दहशतवादी; पुण्यात बनवलं बनावट पारपत्र
- Pune ISIS Module Case: पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात एनआयएला मोठं यश, आठव्या आरोपीला अटक
- Pune ISIS Module Case : साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा रचला होता कट ; पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात धक्कादायक माहिती