पुणे/लखनऊ :- पुण्यातील कोथरूड येथून पुणे पोलीस व एटीएस कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.देशविरोधी कृत्याच्या संशयावरून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर एक आरोपी यात फरार झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पुणे पोलीस व एटीएसला माहिती मिळाली त्या माहितीच्या नुसार त्यांनी कोथरूड परिसरातून त्या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर एक आरोपी फरार आहे. दोन्ही तरुणांच्या लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद माहिती आढळली आहे. देशविरोधी कारवाई केल्याच्या संशयावरून त्या दोन्ही तरुणांना ताब्यात घेण्यात आल असून आज दिवसभर पुणे पोलिसांकडून दोन्ही तरुणांची चौकशी देखील करण्यात आली आहे.
दुसरीकडे उत्तर प्रदेशात आयएसआय एजंट रईसची पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या बॉसशी ओळख करून देणाऱ्या अरमानला यूपी एटीएसने अटक केली आहे. एटीएसने अरमानला मुंबईतून अटक केली आहे. याशिवाय रईसचा साथीदार गोंडा येथील रहिवासी असलेल्या सलमानलाही अटक करण्यात आली आहे. दोघेही मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथे राहत होते. एटीएस आणखी काही संशयितांचा शोध घेत आहे. त्याच्या दोन मदतनीसांनाही लवकरच अटक करण्यात येणार आहे.
एटीएसने गोंडाच्या रईसला अटक केली होती : यूपी एटीएस प्रमुख नवीन अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंडातील तारबगंज येथील रईस याला १६ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान त्याने आयएसआयच्या हँडलरला गोपनीय माहिती पाठवल्याची वस्तुस्थिती मान्य केली होती. एवढेच नाही तर चौकशीदरम्यान त्याने आपल्या काही सहकाऱ्यांची नावेही उच्चारली होती. चौकशीदरम्यान त्याने गोंडा येथील रहिवासी असलेल्या सलमानच्या मदतीने झाशी रेल्वे स्टेशन आणि बबिना मिलिटरी कॅन्टोन्मेंटचे फोटो आणि व्हिडिओ मिळवल्याचे सांगितले होते.