एलजी निवासस्थानाबाहेर 'आप'चे निदर्शने नवी दिल्ली :राजधानी दिल्लीतील सुलतानपुरीच्या कांझावाला भागात 31 डिसेंबरच्या रात्री एका मुलीला काही तरुणांनी कारमधून फरफटत नेले होते. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. आत हे प्रकरण जोर धरत आहे. सोमवारी आम आदमी पार्टीचे नेते आणि 250 हून अधिक कार्यकर्ते लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्यासाठी पोहोचले. (Protest outside LG office and Sultanpuri police). आंदोलकांनी नायब राज्यपाल आणि दिल्ली पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (AAP leaders protest after Kanjhawala incident). या घटनेची जबाबदारी घेत त्यांनी उपराज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावेळी आंदोलकांना रोखण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करण्यात आला. (AAP leaders protest after Kanjhawala incident).
अमित शाहंनी मागितला घटनेचा अहवाल :दिल्लीतील या घटनेची गृहमंत्री अमित शाह यांनी देखील दखल घेतली आहे. शाह यांनी या प्रकरणी दिल्ली पोलिसांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
आपच्या नेत्यांची दिल्ली पोलिसांवर टीका : आपचे नेते आणि प्रवक्ते आदिल खान म्हणाले की, "दिल्ली पोलीस आणि नायब राज्यपाल दिल्लीतील महिला आणि जनतेला सुरक्षा प्रदान करण्यात अपयशी ठरत आहेत. दिल्लीत महिलांसोबत रोजच अशा घटना घडत आहेत, पण दिल्ली पोलीस जनतेला सुरक्षा पुरवू शकत नाहीत, ज्याचा फटका त्यांना सहन करावा लागत आहे". आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार संजीव झा यांनी दिल्ली पोलिस आणि उपराज्यपालांवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, "या परिसरात महिलेसोबत घडलेला प्रकार खरोखरच लाजिरवाणा आहे. दारूच्या नशेच्या कारमधील चालकाने स्कूटीवरून जात असलेल्या महिलेला 4 किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. दिल्लीत अवैध दारू आणि अंमली पदार्थांचा धंदा सुरू आहे, त्याला दिल्लीचे नायब राज्यपाल आणि दिल्ली पोलिस जबाबदार आहेत".
पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी : यावेळी सुलतानपुरी पोलीस ठाण्याबाहेर शेकडो लोक जमा झाले आणि त्यांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. आधी या संपूर्ण घटनेची माहिती कुटुंबीयांना वेळेवर देण्यात आली नाही, आता या प्रकरणावर पडदा टाकण्यात येत आहे. 31 डिसेंबरच्या रात्री दिल्ली पोलीस प्रत्येक ठिकाणी पोलीस तैनात केल्याचा दावा करत असताना, एक वाहन त्या मुलीला पायदळी तुडवत कित्येक किलोमीटर चालत राहिले. यादरम्यान एकाही पोलिसांनी याची दखल घेतली नाही. घटनेनंतर स्थानिक आमदार राखी बिर्लान सुल्तानपुरी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्या, तिथेही त्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. संतप्त लोकांनी राखी बिर्ला यांच्या गाडीचाही घेराव केला. मुख्य रस्ताही काही काळ ठप्प होता, मात्र उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांनी रस्ता मोकळा करून दिला. तरीही लोकांचा रोष कायम आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल एलजीशी बोलले : कांजवाला प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लेफ्टनंट गव्हर्नर विनय सक्सेना यांच्याशी बोलले. या संपूर्ण प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. केजरीवाल म्हणाले की, गुन्हेगारांचे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध असतील तरी त्यांना सोडले जाऊ नये.
स्वाती मालीवाल यांनीही केले आरोप :दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ट्विट करून दिल्ली पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या म्हणाल्या, कोणतीही चौकशी झाली नाही, साक्षीदारांची चौकशी नाही, आपोआप निर्णय दिला गेला की तो फक्त एक अपघात होता… तुम्ही काय लपवण्याचा प्रयत्न करत आहात? दुसर्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले - पूर्वी पत्रकारांना एफआयआरच्या धमकीने घाबरवले जात होते आणि आता पोलिस अशा प्रकारे मीडियाच्या सहकाऱ्यांना मारहाण करत आहेत. काय चाललंय? आपले अपयश लपवण्यासाठी पोलिस माध्यमांनाही काम करू देत नाहीत. लोकशाहीत माध्यमांचा आवाज दाबणे हे हुकूमशाहीचे लक्षण आहे.
पाच आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी :दिल्लीच्या रोहिणी न्यायालयाने आरोपी मनोज मित्तल, दीपक खन्ना, अमित खन्ना, कृष्णा आणि मिथुन यांना तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले आहे.