नवी दिल्ली -इस्रायली स्पायवेअरने देशातील दोन केंद्रीय मंत्री, 40 हून अधिक पत्रकार, तीन विरोधी नेते, एक न्यायाधीश, भारतातील 300 व्यापारी आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याची माहिती एका आंतरराष्ट्रीय मीडिया संघटनेने समोर आणली आहे. केवळ सरकारी संस्थांना विकल्या जाणाऱ्या इस्रायली गुप्तचर स्पायवेअरने हेरगिरी केली आहे. इस्रायली सॉफ्टवेअर पेगाससच्या माध्यमातून भारतीय नेते, पत्रकार आणि इतरांचे फोन हॅक केल्याचे म्हटलं आहे. हा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. यामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. तथापी, भारत सरकारने या दाव्यांना निराधार म्हटले आहे.
भारतातील न्यूज पोर्टल ‘द वायर’सह जगभरातल्या 16 वृत्तसंस्थांनी पेगाससकडून पाळत ठेवली जात असल्याची खातरजमा केली आहे. फ्रान्समधील फॉरबिडन स्टोरीज या मीडिया नॉन प्रॉफिट संस्था आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या मानवाधिकार संघटनेकडे एनएसओच्या फोन नंबरचा डेटा होता. त्यांनी 'पेगासस प्रोजेक्ट' नामक मोहिम राबवून जगभरातील मीडिया संस्थांना ही माहिती दिली. यात भारातील द वायर तसेच ल माँद, द गार्डियन, वॉशिंग्टन पोस्ट, सुडडोईच झाईटुंग, दाई झैट व मेक्सिको, लेबनॉन व युरोपातील अन्य वृत्तसंस्थांना दिली आहे. या शोधपत्रकारितेला या सर्वांनी ‘पेगासस प्रोजेक्ट’ असे नाव दिले आहे. इस्रायली कंपनी एनएसओने पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हॅकिंग केली आहे.
न्यूज पोर्टल ‘द वायर’ने म्हटलं आहे, की पेगाससद्वारे पाळत ठेवण्यात आलेल्या व्यक्तीच्या फोनची फोरेन्सिक चाचणी केली असता 37 फोनमध्ये पेगाससच्या स्पायवेअरने शिरकाव केल्याचे दिसून आले. या 37 जणांमध्ये 10 भारतीय आहेत. द वायरच्या माहितीनुसार या लीक झालेल्या आकडेवारीत हिंदुस्तान टाईम्स, इंडिया टुडे, नेटवर्क 18, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस यासारख्या प्रमुख माध्यम संघटनांच्या प्रमुख पत्रकारांचा समावेश आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टि्वट करून हेरगिरी प्रकरणावरून केंद्रावर निशाणा साधला आहे.
पेगासस सॉफ्टवेअरकडून हेरगिरी केल्याच्या बातम्या निराधार -